जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्‍महत्‍या!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जाधववाडीतील स्वतःच्या दुकानात आंब्याचे व्यापारी आतिश हरिनारायण राठी (वय ४४, रा. सुराणानगर) यांनी शटर बंद करून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना सोमवारी (९ मार्च) सकाळी ११ च्या सुमारास समोर आली.

आतिश यांचा फरसाण, विविध चिवड्यांचा व्यापार होता. उन्हाळ्यात ते आंब्याचीही विक्री करत. रोज सकाळी ५ ते ६ वाजेदरम्यान मोंढ्यात जाऊन माल घेत. त्यानंतर १० ते ११ च्या सुमारास जेवणासाठी घरी यायचे. सोमवारीही पत्नीला सांगून दुकानात गेले. सकाळी ११ च्या सुमारास त्यांचा मित्र दुकानात गेला असता, खाली ओढलेले शटर वर करताच आतिश गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. अतिश यांच्या आईचे सात महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्यांचे आईवर जिवापाड प्रेम होते. आतिश यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, भाऊ असा परिवार आहे. आतिश यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. अधिक तपास सिडको पोलीस करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 

Latest News

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना  पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांत माझ्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत टवाळखोराने साथीदारांसोबत मिळून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी...
शू रॅकमध्ये फ्‍लॅटची चावी ठेवणे पडले महागात, १ लाख ८० हजारांच्या साहित्यावर चोरट्याचा डल्ला!; सुराणानगरातील घटना
कंडोम पॅकिंग मशीन देण्याच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा!; वाळूज MIDC तील घटना
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्‍महत्‍या!
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!;  महसूल मंत्र्यांची घोषणा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software