चक्रावणारी घटना, दोन मित्र, कार, महिला, तिचे मित्र अन्‌ लूट... जयभवानीनगर ते सिडको चौकापर्यंत ते घडलं ते अचंबित करणारे... कसं घडलं ते विस्ताराने वाचा...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पुंडलिकनगर पोलिसांपुढे रविवारी (८ मार्च) एक विचित्र, रहस्यमयी घटना आली. एका ३९ वर्षांच्या पुरुषाने तक्रार दिली. पण तक्रार ऐकताना नक्की काय घडलंय, कशासाठी घडलंय, याचा काहीही थांगपत्ता लागत नव्हता... लूट झाली, मारहाण झाली... ती महिला असं का वागली, हे कोडे बनले... अधिक गोंधळून न टाकता आम्ही तुम्हाला घटना सांगत आहोत, जी त्या पुरुषाने पोलिसांना सांगितली...

सिडको एन २ मध्ये विशाल (वय ३९, नाव बदलले आहे) एकटेच राहतात. रविवारी पहाटे तीनला ते व त्यांचा मित्र अमोल (नाव बदलले आहे) कारने गजानन महाराज मंदिराकडून पुंडलिकनगरमार्गे जयभवानीनगर चौकात आले. तिथे त्यांचा मित्र राकेश (नाव बदलले आहे) येणार होता. त्यामुळे विशाल आणि अमोल हे चौकात थांबले. मोदक हॉटेलजवळून रोड ओलांडून विशालच्या ओळखीच्या श्वेताची (नाव बदलले आहे) पाच वर्षांची मुलगी व तिच्यासोबत एक महिला त्यांच्या कारजवळ आल्या. ती महिला म्हणाली, की श्वेता ही सिडको बसस्थानकाजवळ आहे. सिडको बसस्थानकापर्यंत सोडा. त्यामुळे त्यांना विशाल यांनी कारमध्ये बसवले व सिडको बसस्थानकाकडे निघाले.

थोडे समोर निघताच ती महिला थांबा थांबा, असे म्हणाली. तिने विशाल यांच्या हातातील मोबाइल हिसकावला आणि मुलीला गाडीतून उतरवून पळू लागली. त्यावेळी विशालचा मित्र राकेश मागून आला. विशालने त्याला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर दोघे त्या महिलेचा पाठलाग करू लागले. पाठलाग करत सिडको बसस्थानकाजवळील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याजवळ आले. तेथे त्यांना श्वेता उभी दिसली. त्यामुळे विशालने कार थांबविली. तेथे श्वेतासोबत तीन अनोळखी व्यक्ती होते. त्या तिघांनी विशालला शिवीगाळ केली. कॉलर धरून कारमधून बाहेर ओढले. हाताचापटाने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अमोलने विशालला वाचविण्याचा प्रयत्न केला असता तिघांनी त्यालाही मारहाण केली.

नंतर ते तिघे निघून गेले. १० हजार रुपयांचा मोबाइल व २० हजारांची सोन्याची बाळी गमावल्यानंतर अमोल त्याची कार घेऊन घरी निघून गेला. विशाल आणि राकेश रिक्षाने घरी आले. त्यानंतर विशालने श्वेताला त्या लुटारू महिला, पुरुषांबद्दल माहिती विचारली असता तिने सांगितले, की त्या महिलेचे नाव रुपाली आहे. कानातली बाळी ज्याने काढली आहे त्याचे नाव रोहीत म्हस्के व त्याचा मित्र ऋषिकेश व एक अनोळखी असे आहेत. घाटी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर विशाल यांनी सिडको एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. मात्र घटनेची सुरुवात जय भवानीनगर चौकातून झाली असल्याने त्यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात पाठवले. तिथे विशाल यांनी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी रुपाली, रोहीत म्हस्के, ऋषिकेष (पूर्ण नाव माहीत नाही) व एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली आहे. या चौघांविरुद्ध पुंडलिकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून या घटनेचा उलगडा करण्यास सुरुवात केली आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

चक्रावणारी घटना, दोन मित्र, कार, महिला, तिचे मित्र अन्‌ लूट... जयभवानीनगर ते सिडको चौकापर्यंत ते घडलं ते अचंबित करणारे... कसं घडलं ते विस्ताराने वाचा...

Latest News

चक्रावणारी घटना, दोन मित्र, कार, महिला, तिचे मित्र अन्‌ लूट... जयभवानीनगर ते सिडको चौकापर्यंत ते घडलं ते अचंबित करणारे... कसं घडलं ते विस्ताराने वाचा... चक्रावणारी घटना, दोन मित्र, कार, महिला, तिचे मित्र अन्‌ लूट... जयभवानीनगर ते सिडको चौकापर्यंत ते घडलं ते अचंबित करणारे... कसं घडलं ते विस्ताराने वाचा...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पुंडलिकनगर पोलिसांपुढे रविवारी (८ मार्च) एक विचित्र, रहस्यमयी घटना आली. एका ३९ वर्षांच्या पुरुषाने...
घर बांधणाऱ्या ठेकेदाराने कमालच केली, अर्धवट बांधकाम करून गेटला लावले स्वतःचे कुलूप!; दाम्पत्य हैराण-परेशान... मुकुंदवाडी पोलिसांत धाव!!
चोरट्यांनी हद्दच केली... चक्क न्यायाधीशांच्या बंगल्यावर डल्ला; सिडको एन ३ मधील घटना
सिडको बसस्थानक-हर्सूल रस्त्यावर सुसाट ब्रेझा कारचा थरार; आधी रिक्षा, नंतर दुचाकीला उडवले, केटररर्स व्यावसायिकाचा मृत्यू, रिक्षाचालक जखमी
इमर्जन्सीसाठी पेट्रोल, डिझेलचा साठा राखीव ठेवा, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे सर्व इंधन विक्री कंपन्यांना आदेश
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software