इमर्जन्सीसाठी पेट्रोल, डिझेलचा साठा राखीव ठेवा, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे सर्व इंधन विक्री कंपन्यांना आदेश

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : इस्त्रायल-इराण युद्धामुळे पेट्रोल, डिझेलचा पुरवठा खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर पेट्रोल, डिझेलची टंचाई निर्माण होऊ शकते. ही शक्यता गृहित धरून जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी इमर्जन्सीसाठी पेट्रोल, डिझेलचा साठा राखीव ठेवण्याचे आदेश सर्व इंधन विक्री कंपन्यांना दिले आहेत. ८००० किलोलिटर (१ किलोलिटर म्हणजे १ हजार लिटर) डिझेल आणि ५५०० किलोलिटर पेट्रोल जिल्ह्याला दरमहा लागते.

फुलारी यांच्या आदेशात म्हटले आहे, की युद्धामुळे पेट्रोलियम पदार्थाची पुरवठा साखळी खंडित होण्याची स्थिती उद्‌भवू शकते. त्यामुळे स्थानिक पातळीवर पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होईल. पेट्रोल-डिझेल अत्यावश्यक सेवेत येत असल्याने आपात्कालीन परिस्थितीत अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या शासकीय वाहनांना इंधन तुटवडा निर्माण होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही पेट्रोल पंप मालकांनी साठेबाजी करू नये. त्यांना दरवाढीने इंधनही विकता येणार नाही. तालुका आणि जिल्हा पातळीवरील शासकीय वाहनांसाठी पर्याप्त प्रमाणात पेट्रोल -डिझेल साठा आरक्षित ठेवावा, असे सक्तीचे आदेश बीपीसीएल, आयओसीएल, एचपीसीएल या इंधन पुरवठा कंपन्यांच्या रिटेल सेल्स ऑफिर्ससना दिले आहेत.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिडको बसस्थानक-हर्सूल रस्त्यावर सुसाट ब्रेझा कारचा थरार; आधी रिक्षा, नंतर दुचाकीला उडवले, केटररर्स व्यावसायिकाचा मृत्यू, रिक्षाचालक जखमी

Latest News

सिडको बसस्थानक-हर्सूल रस्त्यावर सुसाट ब्रेझा कारचा थरार; आधी रिक्षा, नंतर दुचाकीला उडवले, केटररर्स व्यावसायिकाचा मृत्यू, रिक्षाचालक जखमी सिडको बसस्थानक-हर्सूल रस्त्यावर सुसाट ब्रेझा कारचा थरार; आधी रिक्षा, नंतर दुचाकीला उडवले, केटररर्स व्यावसायिकाचा मृत्यू, रिक्षाचालक जखमी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको बसस्थानक ते हर्सूल या जळगाव रोडवरील खा. काळे यांच्या घरासमोर सुसाट ब्रेझा कारने...
इमर्जन्सीसाठी पेट्रोल, डिझेलचा साठा राखीव ठेवा, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे सर्व इंधन विक्री कंपन्यांना आदेश
कारखान्यासह बेकरी शॉपला भीषण आगीने वाळूज MIDC त माजला हल्लकल्लोळ!; कोट्यवधींचे नुकसान
युवकाची शेतात गळफास घेऊन आत्‍महत्या, सिल्लोडच्या सिसारखेड्याची घटना
राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या वक्तव्यावरून मंत्री संजय शिरसाटांचा यूटर्न!; म्हणाले, मला लई त्रास देतात हे लोक...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software