राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या वक्तव्यावरून मंत्री संजय शिरसाटांचा यूटर्न!; म्हणाले, मला लई त्रास देतात हे लोक...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मी चार वेळा निवडणूक लढवल्या आणि जिंकल्या. मनात इलेक्शन लढवायचे आले तर पाचव्यांदादेखील येईल, असे सांगत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या वक्तव्यावरून यूटर्न घेतला आहे. मला लई त्रास देतात हे लोक... या सगळ्या ‘जंजाळा’तून मार्ग काढणं अवघड आहे, असेही ते म्हणाले.

एका संस्थेतर्फे तापडिया नाट्य मंदिरात आयोजित जिल्हा परिषद सदस्यांच्या सत्कार सोहळ्यात शनिवारी (७ मार्च) मंत्री शिरसाट बोलत होते. मंत्री अतुल सावे, महापौर समीर राजूरकर, आ. संतोष दानवे यांची उपस्थिती होती. मंत्री शिरसाट म्हणाले, की लोकांच्या मनात आपल्याला जागा निर्माण करायची असते. चांगले काम केले तर ती जागा निर्माण होते. कदाचित पुढच्या वेळी चान्स मिळणार नाही, मात्र आपला कार्यकाळ लक्षात राहावा असे काम आपण केले पाहिजे, असे ते म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि मंत्री शिरसाट यांच्यात राजकीय शीतयुद्ध सुरू आहे. त्यावरून जंजाळ या पक्षनेत्यांकडून सतत झुकते माप मिळत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एवढा विरोध असताना मी चार वेळा आमदार झालो. यावेळी तर मंत्रिपदही मिळवले. ज्या सभागृहात कधी जायला मिळेल की नाही, असे वाटत होते. त्याच सभागृहातील विधानसभा तालिका अध्यक्षपदही भूषवले, असे मंत्री शिरसाट म्हणाले. 

राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले होते...
मंत्री संजय शिरसाट यांनी गेल्या वर्षी २४ ऑक्टोबरला राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले होते. त्याआधीही ९ फेब्रुवारीला ते निवृत्तीबद्दल बोलले होते. मात्र आता त्यांनी त्या वक्तव्यावरून यु टर्न घेतला आहे. शिरसाट त्यावेळी म्हणाले होते, की आमदारकीच्या ४ टर्म झाल्या, आता बस्स झाले. जी. श्रीकांत हे तिकीट कलेक्टर ते आयएएस अधिकारी झाले. उद्या ते राज्याचे मुख्य सचिव होतील. पण तेव्हा मी घरी असेन. सध्याच्या अशा काळात राजकारणात टिकून राहणे फार अवघड आहे, असे ते म्हणाले होते. मी अल्पसंतुष्ट आहे. मी दहा वर्षे नगरसेवक होतो. २० वर्षे आमदार आहे. सर्व स्वप्न भोगले असून, वय काही कारणाने थांबायला भाग पाडते. माझ्यावर कुणाचा दबाव आहे असं नाही, तर आता मी ६४ वर्षांचा आहे. २०२९ पर्यंत ६९ वर्षांचा होईल, असेही ते म्हणाले होते.

जंजाळांमुळे निर्णय बदलला?
सध्या शिंदे गटात मंत्री शिरसाट आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीत. पक्षनेत्यांकडूनही सातत्याने जंजाळांना प्राधान्य दिले जात असल्याची चर्चा असल्याने हे शीतयुद्ध वारंवार चव्हाट्यावर येत असते. आगामी वाटचाल पूर्वीसारखी सोपी राहणार नसल्याने शिरसाट यांनी पुन्हा मैदानात उतरणार असल्याचे जाहीर केल्याची चर्चा होत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिडको बसस्थानक-हर्सूल रस्त्यावर सुसाट ब्रेझा कारचा थरार; आधी रिक्षा, नंतर दुचाकीला उडवले, केटररर्स व्यावसायिकाचा मृत्यू, रिक्षाचालक जखमी

Latest News

सिडको बसस्थानक-हर्सूल रस्त्यावर सुसाट ब्रेझा कारचा थरार; आधी रिक्षा, नंतर दुचाकीला उडवले, केटररर्स व्यावसायिकाचा मृत्यू, रिक्षाचालक जखमी सिडको बसस्थानक-हर्सूल रस्त्यावर सुसाट ब्रेझा कारचा थरार; आधी रिक्षा, नंतर दुचाकीला उडवले, केटररर्स व्यावसायिकाचा मृत्यू, रिक्षाचालक जखमी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको बसस्थानक ते हर्सूल या जळगाव रोडवरील खा. काळे यांच्या घरासमोर सुसाट ब्रेझा कारने...
इमर्जन्सीसाठी पेट्रोल, डिझेलचा साठा राखीव ठेवा, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे सर्व इंधन विक्री कंपन्यांना आदेश
कारखान्यासह बेकरी शॉपला भीषण आगीने वाळूज MIDC त माजला हल्लकल्लोळ!; कोट्यवधींचे नुकसान
युवकाची शेतात गळफास घेऊन आत्‍महत्या, सिल्लोडच्या सिसारखेड्याची घटना
राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या वक्तव्यावरून मंत्री संजय शिरसाटांचा यूटर्न!; म्हणाले, मला लई त्रास देतात हे लोक...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software