चोरट्यांनी हद्दच केली... चक्क न्यायाधीशांच्या बंगल्यावर डल्ला; सिडको एन ३ मधील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर चोऱ्या वाढल्या आहेत. घरे, दुकाने फोडून चोरटे लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेतात. मात्र त्यांना पकडण्यात पोलिसांना यश येत नसल्याचे चित्र आहे. अशातच आता चक्क चोरट्यांनी थेट न्यायाधीशांच्या बंगल्यात शिरून धुमाकूळ घातला. सर्व सामान अस्ताव्यस्त फेकून मौल्यवान वस्तूंचा शोध घेतला. चोरट्यांच्या हाती काहीही मौल्यवान न लागल्याने खाली हात परतले असले तरी, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पुंडलिकरनगर पोलिसांनी रविवारी (८ मार्च) चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

खंडपीठातील अधिकारी उपरजिस्ट्रार प्रशांत नारायण नाईक (रा. सुराणानगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, उच्च न्यायालय खंडपीठात न्यायाधीश नितीन सूर्यवंशी हे सध्या नियुक्त आहेत. त्यांचा स्वतःच्या मालकीचा सुमंगल बंगला एन ३ सिडको येथे आहे. तळमजला आणि त्यावर पहिल्या मजला व दुसरा मजला असे बांधकाम केलेले आहे. बंगल्यात न्यायाधीश श्री. सूर्यवंशी यांचे जुने वापरते साहित्य आहे. त्या ठिकाणी राहण्याकरिता कोणी नाही. बंगल्याच्या देखरेखीकरिता तात्यासाहेब पुंड आहेत. पुंड हे ३ मार्चला रात्री १० वा. बंगला सुरक्षित असल्याची खात्री करून गेले होते.

त्यानंतर रविवारी (८ मार्च) सकाळी त्यांनी बंगल्याची पाहणी केली असता त्यांच्या लक्षात आले की पहिल्या मजल्याच्या लोखंडी गेटला आतून लावलेला कोयंडा ज्याला कुलूप लावण्यात आले होते तो कडीकोयंडा कोणीतरी तोडून चोरीच्या उ‌द्देशाने बंगल्यात प्रवेश केला. पहिल्या मजल्यावरील ऑफिसमधील छोटे लाकडी कपाट उघडून त्यात वस्तूची शोध घेऊन सामान अस्ताव्यस्त फेकलेले आहे. या मजल्यावर एक बेड रूम, स्वयंपाक घर व प्रतीक्षा कक्ष आहे. बेडरूमचे दरवाजे चोरट्याने उघडून दोन कपाट चोरीच्या उ‌द्देशाने तोडून त्यातील सामानांमध्ये मौलवान वस्तूंचा शोध घेऊन इतर सामान अस्ताव्यस्त फेकलेले आहे. तळमजला येथील स्वयंपाक घरामधील भिंतीलगत असलेले लाकडी कपाट उघडून त्यातील गृह उपयोगी साहित्याची शोध घेऊन साहित्य अस्ताव्यस्त केल्याचे दिसले. अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक भंडारे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

चक्रावणारी घटना, दोन मित्र, कार, महिला, तिचे मित्र अन्‌ लूट... जयभवानीनगर ते सिडको चौकापर्यंत ते घडलं ते अचंबित करणारे... कसं घडलं ते विस्ताराने वाचा...

Latest News

चक्रावणारी घटना, दोन मित्र, कार, महिला, तिचे मित्र अन्‌ लूट... जयभवानीनगर ते सिडको चौकापर्यंत ते घडलं ते अचंबित करणारे... कसं घडलं ते विस्ताराने वाचा... चक्रावणारी घटना, दोन मित्र, कार, महिला, तिचे मित्र अन्‌ लूट... जयभवानीनगर ते सिडको चौकापर्यंत ते घडलं ते अचंबित करणारे... कसं घडलं ते विस्ताराने वाचा...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पुंडलिकनगर पोलिसांपुढे रविवारी (८ मार्च) एक विचित्र, रहस्यमयी घटना आली. एका ३९ वर्षांच्या पुरुषाने...
घर बांधणाऱ्या ठेकेदाराने कमालच केली, अर्धवट बांधकाम करून गेटला लावले स्वतःचे कुलूप!; दाम्पत्य हैराण-परेशान... मुकुंदवाडी पोलिसांत धाव!!
चोरट्यांनी हद्दच केली... चक्क न्यायाधीशांच्या बंगल्यावर डल्ला; सिडको एन ३ मधील घटना
सिडको बसस्थानक-हर्सूल रस्त्यावर सुसाट ब्रेझा कारचा थरार; आधी रिक्षा, नंतर दुचाकीला उडवले, केटररर्स व्यावसायिकाचा मृत्यू, रिक्षाचालक जखमी
इमर्जन्सीसाठी पेट्रोल, डिझेलचा साठा राखीव ठेवा, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे सर्व इंधन विक्री कंपन्यांना आदेश
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software