कारखान्यासह बेकरी शॉपला भीषण आगीने वाळूज MIDC त माजला हल्लकल्लोळ!; कोट्यवधींचे नुकसान

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : आसेगाव-निजामपूर शिवारातील गट नं. १९ मधील ए.आर. इंटरप्राइजेस या कोर मेटल बॉक्स तयार करणाऱ्या कंपनीसह कमळापूर रोडवरील मे. गोल्डन बेकर अ‍ॅन्ड दूध डेअरी दुकानाला लागलेल्या भीषण आगीने वाळूज एमआयडीसी परिसरात रविवारी (८ मार्च) एकच हल्लकल्लोळ माजला. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले, पण तोपर्यंत कोट्यवधी रुपयांचे साहित्य खाक झाले. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.

ए.आर. इंटरप्राइजेसला रविवारी सायंकाळी ६ च्या सुमारास भीषण आग लागली. आगीत कंपनीतील १२ मशिनरी जळून खाक झाल्या. सुमारे २ कोटी रुपयांचे रॉ मटेरियल जळाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सायंकाळी ५.३० च्या सुमारास कंपनीचे काम बंद झाले होते. कामगार काम आटोपून घरी गेल्यानंतर काही वेळातच कंपनीत आग लागल्याचे निदर्शनास आले.

माहिती मिळताच वाळूज एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तब्बल ७ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सोमवारी पहाटे १ च्या (मध्यरात्री) सुमारास आग आटोक्यात आणण्यात यश आले. आगीत आणखी काही मशिनरी जळाल्याची शक्यता असून नुकसानीचा आकडा वाढू शकतो, अशी माहिती कंपनीचे मालक लियाकत अली यांनी दिली. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, घटनेची नोंद दौलताबाद पोलिसांनी घेतली आहे.

बेकरी शॉपला पहाटे लागली आग...
कमळापूर रोडवरील मे. गोल्डन बेकर अ‍ॅन्ड दूध डेअरी दुकानाला आज, ९ मार्चला पहाटे २ च्या सुमारास (मध्यरात्री) भीषण आग लागली. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत साडेतीन वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली. आगीत खारी, बिस्कीट, टोस्ट, दूध, दही तसेच वजन काटा, फ्रीज आदी साहित्य जळून खाक झाले असून सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दुकान मालक शफीक इब्राहिम शेख यांनी दिली. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बेकरी शॉप जळाल्याची नोंद वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घेतली.

आग विझविण्यासाठी जिवाची बाजी...
वाळूज एमआयडीच्या अग्निशमन दलातील सब फायर ऑफिसर अनिल देशमुख, फायर लीडर एल. जी. ब्रह्मणकर, एस. जी. वासनिक, एस. व्ही. पाटील, ऑपरेटर योगेश काळे, आर. जे. जाट, सी. एस. पाटील, पी. एस. खडे, एस. बी. सोनवणे, पी. के. राठोड, टी. बी. तांदळे, व्ही. एस. दाभाडे, पी. डी. घुगे, पी. आर. नागरोजा, बी. एम. महाले आणि एस. टी. मुळे यांनी आग विझविण्यासाठी जिवाची बाजी लावली. उन्हाळा सुरू झाल्याने आग लागण्याच्या घटना वाढत असून, अग्निशमन दलालाही अलर्ट राहावे लागत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

चक्रावणारी घटना, दोन मित्र, कार, महिला, तिचे मित्र अन्‌ लूट... जयभवानीनगर ते सिडको चौकापर्यंत ते घडलं ते अचंबित करणारे... कसं घडलं ते विस्ताराने वाचा...

Latest News

चक्रावणारी घटना, दोन मित्र, कार, महिला, तिचे मित्र अन्‌ लूट... जयभवानीनगर ते सिडको चौकापर्यंत ते घडलं ते अचंबित करणारे... कसं घडलं ते विस्ताराने वाचा... चक्रावणारी घटना, दोन मित्र, कार, महिला, तिचे मित्र अन्‌ लूट... जयभवानीनगर ते सिडको चौकापर्यंत ते घडलं ते अचंबित करणारे... कसं घडलं ते विस्ताराने वाचा...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पुंडलिकनगर पोलिसांपुढे रविवारी (८ मार्च) एक विचित्र, रहस्यमयी घटना आली. एका ३९ वर्षांच्या पुरुषाने...
घर बांधणाऱ्या ठेकेदाराने कमालच केली, अर्धवट बांधकाम करून गेटला लावले स्वतःचे कुलूप!; दाम्पत्य हैराण-परेशान... मुकुंदवाडी पोलिसांत धाव!!
चोरट्यांनी हद्दच केली... चक्क न्यायाधीशांच्या बंगल्यावर डल्ला; सिडको एन ३ मधील घटना
सिडको बसस्थानक-हर्सूल रस्त्यावर सुसाट ब्रेझा कारचा थरार; आधी रिक्षा, नंतर दुचाकीला उडवले, केटररर्स व्यावसायिकाचा मृत्यू, रिक्षाचालक जखमी
इमर्जन्सीसाठी पेट्रोल, डिझेलचा साठा राखीव ठेवा, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे सर्व इंधन विक्री कंपन्यांना आदेश
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software