- News
- सिटी डायरी
- मराठवाड्यात आव्हाने भरपूर, पण मात करणार : नव्या विभागीय आयुक्तांची ग्वाही
मराठवाड्यात आव्हाने भरपूर, पण मात करणार : नव्या विभागीय आयुक्तांची ग्वाही
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठवाड्यासमोर दुष्काळ, पाणीटंचाई, अपुरे मनुष्यबळ, शेतकरी आत्महत्यासारखी अनेक आव्हाने आहेत. त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करेल, अशी ग्वाही नवनियुक्त विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. बुधवारी सकाळी गावडे यांनी मराठवाडा विभागीय आयुक्तपदाची सूत्रे प्रभारी आयुक्त जगदीश मिनियार यांच्याकडून स्वीकारली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, महापालिका प्रशासक जी. श्रीकांत, उपायुक्त नयना बोंदर्डे, […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठवाड्यासमोर दुष्काळ, पाणीटंचाई, अपुरे मनुष्यबळ, शेतकरी आत्महत्यासारखी अनेक आव्हाने आहेत. त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करेल, अशी ग्वाही नवनियुक्त विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
-पाऊस बरा झाला आहे. येणाऱ्या काळात चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा आहे.
-टंचाईसाठी उपाययोजनांचा आढावा घेण्यात येईल.
-महसूल सुनावण्यांची प्रकरणे प्रलंबित असतील तर त्यावर निर्णय होईल.
-रोहयो, सामान्य प्रशासनाची, पीक कर्ज, विमा संबंधित प्रकरणांकडे लक्ष देण्यात येईल.

गावडे यांनी पदभार घेताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ. राजेश टोपे यांनी विभागीय आयुक्तालयात येऊन पीककर्ज, पीकविमा, टंचाई, अनुदानाबाबत निवेदन दिले. मागच्या वर्षीचे अनुदान मिळालेले नाही. विमा कंपन्यांनी अनेकांना विमा दिला नाही. ‘रोहयो’ची कामे सुरू आहेत, कामे पूर्ण झाली, परंतु रोहयो आयुक्तांनी पैसे दिलेले नाहीत. पाण्याची टंचाई ग्रामीण भागात आहे. बँका पीककर्ज देत नाहीत. सिबील बघू नका, असे शासनाने सांगितले तरी बँका ऐकत नाहीत. कर्ज वाटपाचे लक्ष्य पूर्ण होण्याची साशंकता आहे. अनेक खाते होल्ड केलेले आहेत. त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मंत्री शिरसाटांच्या कन्या-पुत्राला स्थायी समितीतून का डावलले?
By City News Desk
Latest News
06 Mar 2026 21:18:45
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लग्नानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यावर डल्ला मारल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील...

