भररस्‍त्‍यात ‘माजी’ पत्‍नीच्या गळा, हातावर चाकूचे वार, रक्‍ताच्या थारोळ्यात कोसळली युवती, गजबजलेल्या रोशन गेटवरील थरार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गजबजलेल्या रोशन गेटजवळ एक्स पत्नीच्या गळा, हातावर चाकूचे सपासप वार करून युवकाने गंभीर जखमी केले. युवती रक्‍ताच्या थारोळ्यात कोसळली. लोकांनी मदतीला धावून तिला एमजीएम रुग्णालयात दाखल केले. जिन्सी पोलिसांनी तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सबा फिरदोस शेख (वय ३२, रा. आझाद कॉलेज महेमूदपुरा, वानखेडेनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे, की त्या आई व भावासह राहतात. त्यांचे पहिले लग्न २००७ मध्ये शेख शकील शेख खलील यांच्यासोबत झाले होते. पहिल्या पतीपासून त्यांना तीन मुले आहेत. कौटुंबिक वादावरून पहिल्या पतीसोबत तलाक झाल्यानंतर त्यांनी आलीम जागिरदार अमीन जागिरदार (वय ३०, रा. कटकटगेट इकरा स्कूलजवळ) याच्यासोबत तीन वर्षांपूर्वी दुसरे लग्न केले. सुरुवातीला त्यांचा संसार सुरळीत चालला. मात्र आलीम नशा करून छोट्या छोट्या कारणावरून मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याने सबा या माहेरी राहू लागल्या.

त्यांनी आलीमपासून २०२३ मध्ये तलाक घेतला, असे तक्रारीत म्हटले आहे. १८ फेब्रुवारीला सबा या आईच्या घरी असताना आलीमने त्यांना मोबाइलवर कॉल करून भेटण्यासाठी रोशनगेट येथे बोलावले. न आल्यास मोठ्या मुलाला मारून टाकेन, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत सबा यांनी म्हटले आहे. सबा या त्याला भेटण्यासाठी रात्री साडेआठला रोशन गेट येथे गेल्या. त्यावेळी आलीम तेथे उभा होता. सबा यांना पाहताच तो शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर धावून गेला.

धारदार चाकूने सबा यांच्या गळ्यावर डाव्या बाजूला वार करून तुझ्या हाताची नस कापतो, असे म्हणून त्यांच्या डाव्या हातावर चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले. सबा या बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळल्‍या. तेथील लोकांनी सबा यांच्या भावाला कॉल करून बोलावून घेतले आणि एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटलमधून सुटी झाल्यानंतर त्यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात आलीमविरुद्ध २१ फेब्रुवारीला तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार राजाराम डेडवाल करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

डॉ. भागवत कराडांचे पूत्रप्रेम जागले!; अवघे २५ लाख भागभांडवल असलेल्या कंपनीला ४७०० कोटींचे कंत्राट मिळाले कसे?, जयश्री खाडिलकर यांच्या गंभीर आरोपाने खळबळ

Latest News

डॉ. भागवत कराडांचे पूत्रप्रेम जागले!; अवघे २५ लाख भागभांडवल असलेल्या कंपनीला ४७०० कोटींचे कंत्राट मिळाले कसे?, जयश्री खाडिलकर यांच्या गंभीर आरोपाने खळबळ डॉ. भागवत कराडांचे पूत्रप्रेम जागले!; अवघे २५ लाख भागभांडवल असलेल्या कंपनीला ४७०० कोटींचे कंत्राट मिळाले कसे?, जयश्री खाडिलकर यांच्या गंभीर आरोपाने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सामाजिक कार्यकर्त्या जयश्री खाडिलकर यांनी भाजप नेते डॉ. भागवत कराड यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपाने...
पावणेदोन लाखांचे सोन्याचे गंठण हिसकावून दुचाकीस्वार चोरट्यांनी ठोकली धूम!, एएस क्लब परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगरमध्ये हे चाललं काय... २४ तासांत पोलिसांवर दुसरा हल्ला, रिक्षाचालकाची पोलिसाला बेदम मारहाण!; गळा दाबला, नेमप्लेट-शर्टाचे बटन तोडले..!!
भररस्‍त्‍यात ‘माजी’ पत्‍नीच्या गळा, हातावर चाकूचे वार, रक्‍ताच्या थारोळ्यात कोसळली युवती, गजबजलेल्या रोशन गेटवरील थरार
शहरात धूमस्टाइल मोबाइल चोर सक्रीय... आकाशवाणी चौकाजवळ पायी जाणाऱ्याचा मोबाइल हिसकावून दुचाकीवरून सुसाट गायब...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software