शहरात धूमस्टाइल मोबाइल चोर सक्रीय... आकाशवाणी चौकाजवळ पायी जाणाऱ्याचा मोबाइल हिसकावून दुचाकीवरून सुसाट गायब...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरात दुचाकीवरून येत मोबाइल हिसकावून धूम ठोकणारे चोरटे सक्रीय झाले आहेत. आकाशवाणी चौकाजवळ एका २९ वर्षीय बँक कर्मचाऱ्याचा मोबाइल हिसकावून दुचाकीवरून दोन चोरटे काही मिनिटांत गायब झाले. ही घटना रविवारी (२२ फेब्रुवारी) रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली. जिन्सी पोलिसांनी २ चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ऋषिकेश राजेश निकम (वय २९, रा. संजयनगर, बायजीपुरा, छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते आई, वडील व मोठ्या भावासह राहतात. आयडीएफसी बँकेत नोकरी करतात. ऋषिकेश जेवण करून फिरण्यासाठी बाहेर गेले होते. आकाशवाणी चौकाकडून तोतला हॉस्पिटलच्या रोडने फिरत असताना काबरा हॉस्पिटलसमोर मागून दोघे मोटारसायकलीवरून आले. ऋषिकेश हे मोबाइलवर बोलत असताना मोटारसायकलीवर मागे बसलेल्याने त्यांच्या हातातील १५ हजार रुपयांचा मोबाइल हिसकावला आणि दोघे मोटारसायकलीवरून पळून गेले. त्यांच्या मोटारसायकलीची नंबर प्लेटही खोडलेली दिसली. मोटारसायकल चालवणाऱ्याचा चेहरा दिसला नाही. मागे बसलेल्याचे केस वाढलेले व अंगात काळा शर्ट दिसला. ऋषिकेश हे आरडाओरड करेपर्यंत ते अॅपेक्स हॉस्पिटलच्या दिशेने पळून गेले. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक उपेंद्र कुतुर करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

डॉ. भागवत कराडांचे पूत्रप्रेम जागले!; अवघे २५ लाख भागभांडवल असलेल्या कंपनीला ४७०० कोटींचे कंत्राट मिळाले कसे?, जयश्री खाडिलकर यांच्या गंभीर आरोपाने खळबळ

Latest News

डॉ. भागवत कराडांचे पूत्रप्रेम जागले!; अवघे २५ लाख भागभांडवल असलेल्या कंपनीला ४७०० कोटींचे कंत्राट मिळाले कसे?, जयश्री खाडिलकर यांच्या गंभीर आरोपाने खळबळ डॉ. भागवत कराडांचे पूत्रप्रेम जागले!; अवघे २५ लाख भागभांडवल असलेल्या कंपनीला ४७०० कोटींचे कंत्राट मिळाले कसे?, जयश्री खाडिलकर यांच्या गंभीर आरोपाने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सामाजिक कार्यकर्त्या जयश्री खाडिलकर यांनी भाजप नेते डॉ. भागवत कराड यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपाने...
पावणेदोन लाखांचे सोन्याचे गंठण हिसकावून दुचाकीस्वार चोरट्यांनी ठोकली धूम!, एएस क्लब परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगरमध्ये हे चाललं काय... २४ तासांत पोलिसांवर दुसरा हल्ला, रिक्षाचालकाची पोलिसाला बेदम मारहाण!; गळा दाबला, नेमप्लेट-शर्टाचे बटन तोडले..!!
भररस्‍त्‍यात ‘माजी’ पत्‍नीच्या गळा, हातावर चाकूचे वार, रक्‍ताच्या थारोळ्यात कोसळली युवती, गजबजलेल्या रोशन गेटवरील थरार
शहरात धूमस्टाइल मोबाइल चोर सक्रीय... आकाशवाणी चौकाजवळ पायी जाणाऱ्याचा मोबाइल हिसकावून दुचाकीवरून सुसाट गायब...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software