१५ वर्षांच्या मुलीचा २६ वर्षीय तरुणासोबत लागणार होता बालविवाह!; हळदीच्या कार्यक्रमात धडकले दामिनी पथक..., वाळूज MIDC तील वडगाव कोल्हाटीची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपत्री संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ होत असलेला बालविवाह दामिनी पथक व महिला बालकल्याण समितीच्या संयुक्त प्रयत्नांनी थांबविण्यात आला. १५ वर्षीय मुलीचा विवाह २६ वर्षांच्या तरुणासोबत लावण्यात येत होता. लग्न आज, २२ फेब्रुवारीला होणार होते, मात्र काल, २१ फेब्रुवारीला दुपारीच पथक लग्नघरी धडकले.

पोलीस उपनिरीक्षक कांचन मिरधे यांना या बालविवाहाची माहिती मिळाली होती. त्यांनी तत्काळ महिला बालकल्याण समितीच्या आम्रपाली बोर्डे यांना कळवले. त्‍यानंतर पथकातील सहायक पोलीस उपनिरीक्षक लता जाधव, पोलीस अंमलदार कल्पना खरात, सुधाकर पवार, पूजा जाधव, अमृता भोपळे, सीता ढाकणे, बाळू वने यांच्यासह लग्नघरी धाव घेतली. बालकल्याण समितीच्या प्रतिनिधींसह अंगणवाडी सेविका निर्मला जाधव, सुरेखा खोतकर, प्रियंका पारधे उपस्थित होत्या. लग्नघरी नातेवाइक जमलेले होते. हळदीचा कार्यक्रम सुरू असल्याचे दिसले.

चौकशीतून समोर आले की, घरची परिस्थिती हलाखीची असून मुलगा व मुलगी दोघांचेही वडील नसल्याने नातेवाईकांच्या पुढाकाराने विवाह लावला जात होता. मुलीची आई भांडीकाम करून उदरनिर्वाह करते, अशी माहिती देण्यात आली. बालकल्याण समितीच्या प्रतिनिधींनी नातेवाइकांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती देत मुलगी १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत विवाह करता येत नसल्याचे पटवून दिले. समुपदेशन करून बंदपत्र लिहून घेण्यात आले. मुलीची आई, मुलीचा मावसभाऊ व मुलाची मावशी यांना सर्व कागदपत्रांसह २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता बालकल्याण समिती कार्यलयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले. बालविवाह थांबवून कारवाईची नोंद वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सुसाट क्रेटा कारने मेंढ्यांचा कळप उडवला, ६ मेंढ्यांचा मृत्‍यू, वाळूज MIDC परिसरातील घटना

Latest News

सुसाट क्रेटा कारने मेंढ्यांचा कळप उडवला, ६ मेंढ्यांचा मृत्‍यू, वाळूज MIDC परिसरातील घटना सुसाट क्रेटा कारने मेंढ्यांचा कळप उडवला, ६ मेंढ्यांचा मृत्‍यू, वाळूज MIDC परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : रस्त्याने मेंढ्या घेऊन जात असताना भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत सहा मेंढ्यांचा मृत्यू झाला. ही...
१५ वर्षांच्या मुलीचा २६ वर्षीय तरुणासोबत लागणार होता बालविवाह!; हळदीच्या कार्यक्रमात धडकले दामिनी पथक..., वाळूज MIDC तील वडगाव कोल्हाटीची घटना
बैल कत्तलीसाठी नेले जात असल्याचा संशय, वाळूज MIDC मध्ये ट्रक अडवून चालकासह चौघांना बेदम मारहाण
नापिकी, कर्जबाजारीपणामुळे माजी ग्रा. पं. सदस्याची आत्‍महत्‍या, पैठण तालुक्‍यातील दुर्दैवी घटना
डोक्यात दगड घालून महिलेचा निर्घृण खून, कुणाशी वैर नसताना कुणाच्या अंगात शिरला कूरकर्मा, अवघे गाव शॉक्ड... छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software