नापिकी, कर्जबाजारीपणामुळे माजी ग्रा. पं. सदस्याची आत्‍महत्‍या, पैठण तालुक्‍यातील दुर्दैवी घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शिवगड तांडा (ता. पैठण) येथे नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून ५५ वर्षीय शेतकऱ्याने आत्‍महत्‍या केली. ही घटना शुक्रवारी (२० फेब्रुवारी) रात्री १० च्या सुमारास समोर आली. मधुकर जयसिंह चव्हाण असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

ते आडूळ बुद्रूक ग्रामपंचायतीचे माजी सदस्य होते. त्‍यांना दहा एकर शेती आहे. तांड्यालगतच्या एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेतील त्‍यांचा मृतदेह आढळला. शनिवारी सकाळी त्‍यांच्यावर अंत्‍यसंस्कार करण्यात आले. त्‍यांच्या पश्चात पत्‍नी, मुलगी, दोन मुले, सुना असा परिवार आहे. घटनेची नोंद पाचोड पोलिसांनी घेतली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सुसाट क्रेटा कारने मेंढ्यांचा कळप उडवला, ६ मेंढ्यांचा मृत्‍यू, वाळूज MIDC परिसरातील घटना

Latest News

सुसाट क्रेटा कारने मेंढ्यांचा कळप उडवला, ६ मेंढ्यांचा मृत्‍यू, वाळूज MIDC परिसरातील घटना सुसाट क्रेटा कारने मेंढ्यांचा कळप उडवला, ६ मेंढ्यांचा मृत्‍यू, वाळूज MIDC परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : रस्त्याने मेंढ्या घेऊन जात असताना भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत सहा मेंढ्यांचा मृत्यू झाला. ही...
१५ वर्षांच्या मुलीचा २६ वर्षीय तरुणासोबत लागणार होता बालविवाह!; हळदीच्या कार्यक्रमात धडकले दामिनी पथक..., वाळूज MIDC तील वडगाव कोल्हाटीची घटना
बैल कत्तलीसाठी नेले जात असल्याचा संशय, वाळूज MIDC मध्ये ट्रक अडवून चालकासह चौघांना बेदम मारहाण
नापिकी, कर्जबाजारीपणामुळे माजी ग्रा. पं. सदस्याची आत्‍महत्‍या, पैठण तालुक्‍यातील दुर्दैवी घटना
डोक्यात दगड घालून महिलेचा निर्घृण खून, कुणाशी वैर नसताना कुणाच्या अंगात शिरला कूरकर्मा, अवघे गाव शॉक्ड... छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software