छत्रपती संभाजीनगरमध्ये हे चाललं काय... २४ तासांत पोलिसांवर दुसरा हल्ला, रिक्षाचालकाची पोलिसाला बेदम मारहाण!; गळा दाबला, नेमप्लेट-शर्टाचे बटन तोडले..!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरात पोलिसांचा वचक संपला की काय, असा प्रश्न निर्माण व्हावा, अशा घटना सलग दोन घटना समोर आल्या आहेत. हायकोर्ट सिग्नलवर एका दाम्‍पत्‍याने २ वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच, आता रिक्षाचालकाने पोलीस अंमलदाराला बेदम मारहाण केल्याची घटना सिडको एन ११ मध्ये समोर आली. रिक्षाचालक, त्याच्या आई-वडिलांनी पोलिसाला मारहाण करताना गळा दाबला, नेमप्लेट आणि शर्टची बटने तोडली. सिडको पोलिसांनी तिघांनाही ताब्‍यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस अंमलदार विनोद गजानन खरात (वय ३८) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते डायल ११२ च्या कर्तव्यावर होते. त्यांना तुषार नावाच्या युवकाचा कॉल आला. पार्किंगमध्ये लागलेल्या कारला एका ऑटोचालकाने दारू पिऊन धडक दिली असून, तो अरेरावी करत असल्याने पोलीस मदत हवी असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे खरात हे पोलीस अंमलदार कवाळे यांच्यासह घटनास्थळी सिडको एन ११ सुदर्शननगर साई मैदानाजवळील नम्रता किराणा दुकानाजवळ आले. तिथे ऑटोचालक शुभम रणयेवले नशा केलेला दिसत होता. त्याच्याकडील रिक्षाने तुषार यांच्या गाडीला मागून धडक दिलेली होती.

तुषार आणि त्यांच्या वहिणीला तो घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करत होता पोलिसांनी तुषार यांना पोलीस ठाण्यात येऊन तक्रार देण्यास सांगत शुभमला ताब्‍यात घेतले. अपघात केलेली रिक्षाही पोलीस ठाण्यात आणण्यास सांगितली. सर्व जण पोलीस ठाण्यात येत असताना पोलिसांसमोरच शुभम हा पुन्हा तुषार यांना शिवीगाळ करू लागला. पोलिसांनी त्याला शांत बसण्यास सांगितले असता शुभमच्या आईने पोलीस अंमलदार खरात यांचा उजवा हात ओढून धरला व माझ्या मुलाला बोलू नको. मी त्याला पोलीस ठाण्याला घेऊन जाऊ देणार नाही, असे धमकावले. शुभमने रिक्षातच पोलीस अंमलदार खरात यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या वर्दीचे लाईनयार्ड, नेमप्लेट तसेच शर्टाचे बटनदेखील तोडले. शुभम हा खरात यांना मारत असताना त्याचे वडील राजेंद्र रणयेवले यांनीही खरात यांचा गळा दाबला.

तुषार यांनी राजेंद्र रणयेवले यांना ओढून पोलिसांपासून दूर केले. खरात आणि कवाळे यांनी शुभमला धरून ठेवले व पोलीस अंमलदार सानप यांना संपर्क करून घटनास्थळी बोलावून घेतले. त्यावेळीही शुभम, त्याचे आई-वडील पोलिसांना शिवीगाळ करून तुम्हाला बघुन घेऊ. आम्ही तुम्हाला सोडणार नाही, अशा धमक्या देत होते. पोलिसांनी शुभम व त्याच्या आई, वडिलांविरुद्ध (सर्व रा. नवजीवन कॉलनी, एन ११, हडको) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सोपान नराळे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

डॉ. भागवत कराडांचे पूत्रप्रेम जागले!; अवघे २५ लाख भागभांडवल असलेल्या कंपनीला ४७०० कोटींचे कंत्राट मिळाले कसे?, जयश्री खाडिलकर यांच्या गंभीर आरोपाने खळबळ

Latest News

डॉ. भागवत कराडांचे पूत्रप्रेम जागले!; अवघे २५ लाख भागभांडवल असलेल्या कंपनीला ४७०० कोटींचे कंत्राट मिळाले कसे?, जयश्री खाडिलकर यांच्या गंभीर आरोपाने खळबळ डॉ. भागवत कराडांचे पूत्रप्रेम जागले!; अवघे २५ लाख भागभांडवल असलेल्या कंपनीला ४७०० कोटींचे कंत्राट मिळाले कसे?, जयश्री खाडिलकर यांच्या गंभीर आरोपाने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सामाजिक कार्यकर्त्या जयश्री खाडिलकर यांनी भाजप नेते डॉ. भागवत कराड यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपाने...
पावणेदोन लाखांचे सोन्याचे गंठण हिसकावून दुचाकीस्वार चोरट्यांनी ठोकली धूम!, एएस क्लब परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगरमध्ये हे चाललं काय... २४ तासांत पोलिसांवर दुसरा हल्ला, रिक्षाचालकाची पोलिसाला बेदम मारहाण!; गळा दाबला, नेमप्लेट-शर्टाचे बटन तोडले..!!
भररस्‍त्‍यात ‘माजी’ पत्‍नीच्या गळा, हातावर चाकूचे वार, रक्‍ताच्या थारोळ्यात कोसळली युवती, गजबजलेल्या रोशन गेटवरील थरार
शहरात धूमस्टाइल मोबाइल चोर सक्रीय... आकाशवाणी चौकाजवळ पायी जाणाऱ्याचा मोबाइल हिसकावून दुचाकीवरून सुसाट गायब...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software