वाळूज एमआयडीसीत पेट्रोलपंपावर गावगुंडांचा राडा, ‘आम्ही पंढरपूरचे भाई लोक’ म्हणत पंप कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बाटलीत पेट्रोल देण्यास नकार दिल्याने संतप्त टवाळखोरांनी आम्ही पंढरपूरचे दादा, भाई लोक आहोत, असे म्हणत वाळूज एमआयडीसीच्या ओएसिस चौकातील राजपूत पेट्रोलपंपावर राडा केला. शनिवारी (२१ फेब्रुवारी) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी या राड्याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे.

फकीर दशरथ मुंगसे (वय ४०, रा. गोलवाडी) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. तक्रारीत म्हटले आहे, की ते राजपूत पेट्रोलपंपावर कर्मचारी आहेत. शनिवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास पेट्रोलपंपावर चार जण आले. त्यांनी बाटलीत पेट्रोल मागितले. त्यावर मुंगसे यांनी त्यांना बाटलीत पेट्रोल देण्यास मनाई असल्याचे सांगितले. त्यामुळे चौघेही संतप्त झाले. एकाने स्वतःचे नाव राजू शेख सांगत आम्ही पंढरपूरचे दादा भाई लोक आहोत, आम्हाला ओळखत नाहीस का, असे म्हणत शिवीगाळ सुरू केली.

दुसऱ्याने स्वतःचे नाव हसीम बेग म्हणत तू पंढरपूरच्या कोणालाही विचार, तू तुम्हाला कसा काय ओळखत नाही, असे म्हणत बाजूला पडलेला दगड उचलून मुंगसे यांच्या डोक्यात मारला. सर्वांनी मिळून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. जखमी मुंगसे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून हसीम बेग, अरबाज शेख आणि दिवेश बनकर या तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. चौथ्याचा शोध सुरू आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

डॉ. भागवत कराडांचे पूत्रप्रेम जागले!; अवघे २५ लाख भागभांडवल असलेल्या कंपनीला ४७०० कोटींचे कंत्राट मिळाले कसे?, जयश्री खाडिलकर यांच्या गंभीर आरोपाने खळबळ

Latest News

डॉ. भागवत कराडांचे पूत्रप्रेम जागले!; अवघे २५ लाख भागभांडवल असलेल्या कंपनीला ४७०० कोटींचे कंत्राट मिळाले कसे?, जयश्री खाडिलकर यांच्या गंभीर आरोपाने खळबळ डॉ. भागवत कराडांचे पूत्रप्रेम जागले!; अवघे २५ लाख भागभांडवल असलेल्या कंपनीला ४७०० कोटींचे कंत्राट मिळाले कसे?, जयश्री खाडिलकर यांच्या गंभीर आरोपाने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सामाजिक कार्यकर्त्या जयश्री खाडिलकर यांनी भाजप नेते डॉ. भागवत कराड यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपाने...
पावणेदोन लाखांचे सोन्याचे गंठण हिसकावून दुचाकीस्वार चोरट्यांनी ठोकली धूम!, एएस क्लब परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगरमध्ये हे चाललं काय... २४ तासांत पोलिसांवर दुसरा हल्ला, रिक्षाचालकाची पोलिसाला बेदम मारहाण!; गळा दाबला, नेमप्लेट-शर्टाचे बटन तोडले..!!
भररस्‍त्‍यात ‘माजी’ पत्‍नीच्या गळा, हातावर चाकूचे वार, रक्‍ताच्या थारोळ्यात कोसळली युवती, गजबजलेल्या रोशन गेटवरील थरार
शहरात धूमस्टाइल मोबाइल चोर सक्रीय... आकाशवाणी चौकाजवळ पायी जाणाऱ्याचा मोबाइल हिसकावून दुचाकीवरून सुसाट गायब...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software