पावणेदोन लाखांचे सोन्याचे गंठण हिसकावून दुचाकीस्वार चोरट्यांनी ठोकली धूम!, एएस क्लब परिसरातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लग्न सोहळ्यात हजेरी लावून परतताना ६२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सुमारे १ लाख ८० हजार रुपयांचे ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण दुचाकीवरील दोन चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना रविवारी (२२ फेब्रुवारी) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास एएस क्लब परिसरातील ३६ गुण मंगल कार्यालयात समोर आली.

छाया श्रीकांत दीक्षित (वय ६२, रा. एन ९, हडको, संत ज्ञानेश्वरनगर, छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. लग्न आटोपून त्या नातेवाइकांसह वाहनाकडे जात असताना वळदगाव रोडवरून आलेल्या दुचाकीस्वार २ चोरट्यांनी छाया यांचे सोन्याचे गंठण हिसकावून नेले. सोन्याचे गंठण सन २०१२ साली बनवलेले असून त्याची किंमत अंदाजे १,८०,००० रुपये आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाथरकर करत आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी सुरू केली असून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

डॉ. भागवत कराडांचे पूत्रप्रेम जागले!; अवघे २५ लाख भागभांडवल असलेल्या कंपनीला ४७०० कोटींचे कंत्राट मिळाले कसे?, जयश्री खाडिलकर यांच्या गंभीर आरोपाने खळबळ

Latest News

डॉ. भागवत कराडांचे पूत्रप्रेम जागले!; अवघे २५ लाख भागभांडवल असलेल्या कंपनीला ४७०० कोटींचे कंत्राट मिळाले कसे?, जयश्री खाडिलकर यांच्या गंभीर आरोपाने खळबळ डॉ. भागवत कराडांचे पूत्रप्रेम जागले!; अवघे २५ लाख भागभांडवल असलेल्या कंपनीला ४७०० कोटींचे कंत्राट मिळाले कसे?, जयश्री खाडिलकर यांच्या गंभीर आरोपाने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सामाजिक कार्यकर्त्या जयश्री खाडिलकर यांनी भाजप नेते डॉ. भागवत कराड यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपाने...
पावणेदोन लाखांचे सोन्याचे गंठण हिसकावून दुचाकीस्वार चोरट्यांनी ठोकली धूम!, एएस क्लब परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगरमध्ये हे चाललं काय... २४ तासांत पोलिसांवर दुसरा हल्ला, रिक्षाचालकाची पोलिसाला बेदम मारहाण!; गळा दाबला, नेमप्लेट-शर्टाचे बटन तोडले..!!
भररस्‍त्‍यात ‘माजी’ पत्‍नीच्या गळा, हातावर चाकूचे वार, रक्‍ताच्या थारोळ्यात कोसळली युवती, गजबजलेल्या रोशन गेटवरील थरार
शहरात धूमस्टाइल मोबाइल चोर सक्रीय... आकाशवाणी चौकाजवळ पायी जाणाऱ्याचा मोबाइल हिसकावून दुचाकीवरून सुसाट गायब...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software