भर रस्‍त्‍यात वाहतूक पोलिसांना दारूड्याची मारहाण, तासभर हायकोर्ट सिग्नलजवळ घातला धिंगाणा!; कानशीलात मारली, लोटपोट केली, पोलिसांच्याच मदतीला तासभराने आले पोलीस!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुभाजकाजवळून झुलत झुलत गाडी चालवत असल्याने संशयावरून वाहतूक पोलिसांनी दुचाकीस्वाराला थांबवले. तो दारूच्या नशेत होता. थांबविल्याच्या कारणावरून या दारूड्याने वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. त्याने आणि त्याच्या पत्नीने मिळून वाहतूक पोलिसांना मारहाण सुरू केली. भररस्‍त्‍यात कानशिलात लगावली. दोन पोलिसांच्या मदतीला पोलीस यायला १ तास लागला. तोपर्यंत दारूड्याचा धिंगाणा सुरूच होता. हा धक्कादायक प्रकार जालना रोडवरील हायकोर्ट सिग्नलजवळ रविवारी (२२ फेब्रुवारी) दुपारी साडेचारच्या सुमारास घडला. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात पती-पत्नीविरुद्ध गुन्हा नोंदविल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिली.

सोमनाथ मुरलीधर गिरी (वय २७) आणि अनिता सोमनाथ गिरी (वय २५, मूळ रा. चांदानगर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर, ह. मु., विजयनगर, छत्रपती संभाजीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या पती, पत्नीची नावे आहेत. सिडको वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार रावसाहेब पचलोरे (वय ४७) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, पोलीस अंमलदार संतोष खरात यांच्यासह ते हायकोर्ट सिग्नल चौकात कर्तव्यावर होते. सोमनाथ दुचाकीने (क्र. एमएच १७ सीक्यू ६७४२) जात होता. डिव्हायडर जवळून झुलवत झुलवत गाडी चालवत असल्याने पचलोरे यांनी त्याला थांबवले. तो दारू पिल्याचे आढळले. थांबविल्यामुळे संतप्त झालेल्या सोमनाथने पचलोरे यांच्याशी हुज्जत घालत शिवीगाळ सुरू केली. तुम्हाला दोन दिवसांत बघून घेतो, अशी धमकीही दिली. पचलोरे यांच्या गालावर मारले. खरात यांच्यावरही हात उचलला.

त्याने पत्नीलाही बोलावून घेतले. पत्नी आल्यानंतर दोघांनी धिंगाणा घालायला सुरुवात केली. पोलिसांना लोटपोट केली. सोमनाथ रस्त्यावर जाऊन झोपला आणि वाहतुकीला अडथळा निर्माण केला. पोलिसांनी पुंडलिकनगर पोलीस ठाणे आणि नियंत्रण कक्षाला कळवले. पण त्यांच्यासाठी मदत यायला तब्बल १ तास लागला. तोपर्यंत या दाम्‍पत्‍याचा कहर पोलिसांना सहन करावा लागला. पोलिसांच्या मदतीला पोलीसच लवकर येत नसल्याचे पाहून नागरिकांनीच या पोलिसांच्या मदतीला धावून दारूड्याला आवरण्यासाठी पुढाकार घेतला. एक तासानंतर पुंडलिकनगर पोलीस आणि दामिनी पथक आले. पुंडलिकनगर पोलिसांनी दाम्‍पत्‍याला ताब्‍यात घेऊन त्‍यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

डॉ. भागवत कराडांचे पूत्रप्रेम जागले!; अवघे २५ लाख भागभांडवल असलेल्या कंपनीला ४७०० कोटींचे कंत्राट मिळाले कसे?, जयश्री खाडिलकर यांच्या गंभीर आरोपाने खळबळ

Latest News

डॉ. भागवत कराडांचे पूत्रप्रेम जागले!; अवघे २५ लाख भागभांडवल असलेल्या कंपनीला ४७०० कोटींचे कंत्राट मिळाले कसे?, जयश्री खाडिलकर यांच्या गंभीर आरोपाने खळबळ डॉ. भागवत कराडांचे पूत्रप्रेम जागले!; अवघे २५ लाख भागभांडवल असलेल्या कंपनीला ४७०० कोटींचे कंत्राट मिळाले कसे?, जयश्री खाडिलकर यांच्या गंभीर आरोपाने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सामाजिक कार्यकर्त्या जयश्री खाडिलकर यांनी भाजप नेते डॉ. भागवत कराड यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपाने...
पावणेदोन लाखांचे सोन्याचे गंठण हिसकावून दुचाकीस्वार चोरट्यांनी ठोकली धूम!, एएस क्लब परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगरमध्ये हे चाललं काय... २४ तासांत पोलिसांवर दुसरा हल्ला, रिक्षाचालकाची पोलिसाला बेदम मारहाण!; गळा दाबला, नेमप्लेट-शर्टाचे बटन तोडले..!!
भररस्‍त्‍यात ‘माजी’ पत्‍नीच्या गळा, हातावर चाकूचे वार, रक्‍ताच्या थारोळ्यात कोसळली युवती, गजबजलेल्या रोशन गेटवरील थरार
शहरात धूमस्टाइल मोबाइल चोर सक्रीय... आकाशवाणी चौकाजवळ पायी जाणाऱ्याचा मोबाइल हिसकावून दुचाकीवरून सुसाट गायब...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software