पतीला दारू पिण्यास रोखणाऱ्या पत्‍नीच्या पोट, पाठीवर कैचीचे वार!; वाळूज MIDC तील घटनेत महिला गंभीर जखमी, घाटीत उपचार सुरू

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील घाणेगावमध्ये पतीला दारू पिण्यास रोखणाऱ्या ३० वर्षीय विवाहितेवर कैचीने पोट, पाठीवर वार करण्यात आले. यात ती गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या तिची प्रकृती धोक्‍याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. पत्‍नीच्या जबाबावरून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी पतीविरुद्ध रविवारी (२७ जुलै) गुन्हा दाखल केला आहे.

जयश्री गौतम बनसोडे (वय ३०, रा. घाणेगाव, ता. गंगापूर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचे पती गौतम बनसोडे वाळूज एमआयडीसीतील पंढरपूरच्या ओमसाई कंपनीत काम करतात. शनिवारी (२६ जुलै) सकाळी साडे अकराच्या सुमारास त्या व त्यांचे पती घरी असताना पती गौतम बाहेर गेला व दारू पिऊन घरी आला. जयश्री यांना म्हणाला, की तुझ्याजवळ असलेले तीन हजार रुपये मला दारू पिण्यासाठी दे. त्यावर जयश्री यांनी त्याला दारू पिऊ नका व मी पैसे देणार नाही, असे सांगितले.

त्यावर त्याने शिवीगाळ करून हाताचापटाने मारहाण केली. शिलाई मशिनच्या कपडे कापण्याच्या कैचीने त्यांच्या पोटात व पाठीवर वार करून गंभीर जखमी केले. त्याच्या हातातील कैची पकडली असता जयश्री यांच्या डाव्या हाताच्या बोटालाही जखम झाली. शेजारी राहणाऱ्यांनी जयश्री यांच्या मदतीला धावून भांडण सोडविले. त्‍यानंतर जयश्री यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिवीगाळ करून हाताचापटाने मारहाण करून कैचीने पोटावर, पाठीवर व डाव्या हातावर मारून जखमी केल्याने जयश्री यांच्या पोटावर चार टाके पडले आहेत. अधिक तपास पोलीस अंमलदार मंगेश मनोरे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

रत्नाकर फायनान्समधून महिलांना अश्लील कॉल!; जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, कसे येता कॉल, कुठून मिळवतात नंबर, जाणून घेऊ...

Latest News

रत्नाकर फायनान्समधून महिलांना अश्लील कॉल!; जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, कसे येता कॉल, कुठून मिळवतात नंबर, जाणून घेऊ... रत्नाकर फायनान्समधून महिलांना अश्लील कॉल!; जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, कसे येता कॉल, कुठून मिळवतात नंबर, जाणून घेऊ...
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : निगडीच्या रत्‍नाकर फायनान्समधून सुभाष राणोजी देसाई नावाच्या व्यक्‍तीला ६ महिलांना अश्लील कॉल करून धमकावण्यात आल्याचा...
मोबदला न देता मालमत्ता पाडाल तर सामूहिक आत्‍मदहन करू!;  हर्सूलवासियांचा पवित्रा
नवीनच... काय तर म्हणे महिला डॉक्‍टरने चिमटे घेतले!, चिकलठाण्याच्या मिनी घाटीत हे काय घडलं...
दोन संतापजनक घटना : साडी खरेदीस आलेल्या विवाहितेकडे पाहून सेल्समनचे अश्लील चाळे!, पैठण गेट भागातील घटनेने तणाव; टीव्ही सेंटर भागात विद्यार्थिनीचा पाठलाग करणाऱ्या दोन रोडरोमिओंना चोप!
पानदरिबा भागात तणाव : पोलिसांनी वेळीच धाव घेऊन परिस्थिती आणली नियंत्रणात, दंगा काबू पथक तैनात, नक्की काय झालं...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software