मोबदला न देता मालमत्ता पाडाल तर सामूहिक आत्‍मदहन करू!;  हर्सूलवासियांचा पवित्रा

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : टीडीआर काय आहे, आम्हाला कळत नाही. तो विकण्यासाठी कोणत्या बिल्डरच्या दारावर आम्ही जायचे, १०० फुटांचा रस्ता पुरेसा असताना २०० फूट रस्त्याची काय गरज आहे, मोबदला दिल्याशिवाय मालमत्ता पाडल्या तर सामूहिक आत्मदहन करू, अशा कडक शब्‍दांत हर्सूलवासियांनी महापालिकेला बुधवारी (३० जुलै) सुनावले.

हर्सूलमध्ये २०० फूट रस्‍त्‍यासाठी पाडापाडीला विरोध होत असून, आधी मोबदल्याची मागणी केली जात आहे. उच्‍च न्‍यायालयात सांगताना महापालिकेने असे म्‍हटले होते, की सध्या केवळ रस्‍ता रूंदीकरण करत असून, मालमत्ता ताब्‍यात घेत नाहीये. जेव्हा ताब्‍यात घेऊ त्‍यावेळी मोबदला देण्यात येईल. मात्र मोबदला न देताच करण्यात येणाऱ्या पाडापाडीला नागरिकांचा तीव्र विरोध आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशानुसार महापालिका आणि पोलिसांनी संयुक्‍तरित्या मालमत्ताधारकांची बैठक जळगाव रोडवरील संत गजानन महाराज मंदिरात बैठक घेतली.

ऐन पावसाळ्यात कुटुंब घेऊन आम्ही कुठे जाणार, असा सवाल मालमत्ताधारकांनी सुरुवातीलाच केली. बैठकीला सहायक पोलीस आयुक्त सुदर्शन पाटील, पोलीस निरीक्षक डॉ. सुनीता मिसाळ, महापालिकेचे अधिकारी संजय सुरडकर, अशोक गिरी यांच्यासह नरेंद्र औताडे, युनूस पटेल, बाळासाहेब औताडे, संजय औताडे, मनोज जाधव, जावेद पटेल, संतोष रोडे, अंकुश औताडे, संजय भगुरे, संदीप भगुरे, सुरेश औताडे व अन्य नागरिक उपस्थित होते.

काय आहे मागण्या...
-गावातील पुरातन मंदिर, कब्रस्तान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पर्यायी जागा द्यावी.
-पूर्ण घरे जाणाऱ्यांचे पुनर्वसन करावे, टीडीआर नको, रोख मोबदला द्यावा.
-रस्ता करणार नसतील तर आताच घरे पाडण्याची काय गरज, रस्ता करताना घरे स्वतःहून काढून घेऊ.
-हर्सूल गावात उड्डाणपूल करावा.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

प्रेयसीला बेल्ट, कुऱ्हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण!, ४ वर्षांपासून 'लिव्ह इन'मध्ये राहतात, लग्‍नाची मागणी करताच प्रियकर बनला हैवान!!, वाळूज MIDC तील धक्कादायक घटना

Latest News

प्रेयसीला बेल्ट, कुऱ्हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण!, ४ वर्षांपासून 'लिव्ह इन'मध्ये राहतात, लग्‍नाची मागणी करताच प्रियकर बनला हैवान!!, वाळूज MIDC तील धक्कादायक घटना प्रेयसीला बेल्ट, कुऱ्हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण!, ४ वर्षांपासून 'लिव्ह इन'मध्ये राहतात, लग्‍नाची मागणी करताच प्रियकर बनला हैवान!!, वाळूज MIDC तील धक्कादायक घटना
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ४ वर्षे ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राजरोस संबंध ठेवले. तिने लग्‍नाची मागणी करताच संतापलेल्या प्रियकराने बेल्ट,...
वाळूज एमआयडीसीत मद्यधुंद क्रूझरचालकाचा थरार, ५ वाहने उडवली, ४ शिक्षिकांसह रिक्षाचालक जखमी
व्यापारी गजानन देशमुख यांचा मुलगा इंद्रसेन बेपत्ता; स्‍कूलबस सुटल्याने पालक रागावण्याच्या भीतीने घर सोडल्याची शक्यता!, अपहरणाचा गुन्हा दाखल करून पुंडलिकनगर पोलिसांकडून युद्धपातळीवर शोध सुरू
सहा महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण करून हैदराबादला विकण्याआधीच छ. संभाजीनगरमध्ये टोळी पकडली!, मोठ्या रॅकेटची शक्‍यता 
चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software