- Marathi News
- सिटी क्राईम
- रत्नाकर फायनान्समधून महिलांना अश्लील कॉल!; जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, कसे येतात कॉल, कुठून
रत्नाकर फायनान्समधून महिलांना अश्लील कॉल!; जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, कसे येतात कॉल, कुठून मिळवतात नंबर, जाणून घेऊ...
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : निगडीच्या रत्नाकर फायनान्समधून सुभाष राणोजी देसाई नावाच्या व्यक्तीने ६ महिलांना अश्लील कॉल करून धमकावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दीपक ससाणे नावाच्या व्यक्तीने त्यांच्या कंपनीतून दीड लाखाचे कर्ज घेतले असून, तुम्ही जामीनदार असल्याचे सांगून हा देसाई नामक गुंड धमकावत होता. वैतागलेल्या महिलांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर बुधवारी (३० जुलै) या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्जधारकाशी काहीही संबंध नसतानाही सिडको, जवाहरनगरमधील १० ते १५ महिलांना बुधवारी कर्ज प्रकरणात जामीनदार असल्याचे सांगत अश्लील शिवीगाळ, धमक्या देण्यात आल्याचे समोर आले आहे. जवाहरनगर भागात कपड्यांचे दुकान असलेल्या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ३० जुलैला त्यांना निगडीच्या रत्नाकर फायनान्समधून सुभाष देसाई नावाच्या गुंडाने कॉल केला. दीपक ससाणे यांनी दीड लाखाचे कर्ज घेतले असून, तुम्ही जामीनदार असल्याचे तो म्हणाला. महिलेने ससाणे यांना ओळखत नसल्याचे त्याला स्पष्ट सांगितले. तरीही तो पैसे भरण्यासाठी धमकावून अश्लील शिवीगाळ करू लागला. या महिलेच्या ३ मैत्रिणींनाही त्याने असेच फोन केले. याच पद्धतीने कॉलद्वारे जामीनदार असल्याचे सांगून फॅशन अकॅडमी चालविणाऱ्या महिलेला आणि सिडको परिसरात राहणाऱ्या ४ महिलांनाही कॉल आले. ससाणे हे पोलीस कर्मचारी असल्याचे समोर येत आहे. त्यांनी कोटक बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे रक्कम उचलली होती. त्यांची व या महिलांची ओळखही नाही. तरीही मैत्रिणी असलेल्या एकाच ग्रुपमधील १० ते १५ महिलांना एकाच दिवशी कॉल गेल्याने यंत्रणाही हादरून गेली आहे.
क्रेडिट कार्डच्या थकीत रकमेच्या वसुलीसाठी बँका, वित्तीय कंपन्या खासगी कंपन्यांना वसुलीच्या टक्केवारीवर कंत्राट देते. या खासगी कंपन्यांमध्ये बहुतांश गुंडांची भरती असते. ते वसुलीसाठी संबंधित थकबाकीदाराच्या घरी जाऊन चारचौघात अपमान होईल अशा पद्धतीने अरेरावी करतात. त्यामुळे रक्कम भरण्यासाठी ग्राहकावर आपोआपच दबाव निर्माण होतो. मात्र ही पद्धत गैरकायदेशीर असून, याविरोधात ग्राहक पोलिसांत तक्रार करू शकतो, असे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे. कर्जवसुलीचे कायदेशीर मार्ग सोडून वित्तीय कंपन्या आणि बँका ज्या पद्धतीने कारभार चालवतात, हे अत्यंत धक्कादायक असते. याविरोधात पोलीस तक्रारी झाल्या तरच लगाम लागू शकतो, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.
संबंधित बँक, फायनान्स कंपनीचे ॲप डाऊनलोड करताना आपण अनेकदा कॉन्टॅक्ट डेटाही त्यांच्याशी सामायिक करण्यास परवानगी देतो. त्यामुळे आपोआपच मोबाइलमधील नंबर या कंपन्यांकडे पोहोचतात. वसुलीसाठी ते या नंबरवर संपर्क करून खोटे खोटेच तुम्ही जामीनदार आहेत, तुमचा नंबर कर्ज घेताना दिला होता, असे खोटेच सांगतात. ज्यामुळे संबंधित व्यक्ती कर्जदाराला विचारणा करतात. मात्र असा कॉल आल्यावर न घाबरता स्पष्टपणे मी कुठे लेखी दिले आहे का, कुठे सही केली आहे का, असेल तर ते डॉक्युमेंट घेऊन पोलीस ठाण्यात या, असे सुनवावे. पुन्हा कॉल आला तर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा इशारा द्यावा. अनेकदा कर्जदार आणि कॉल आलेली व्यक्ती एका बँकेची ग्राहक असते आणि ते जवळ जवळ राहत असतात. ही बाब पत्ते बँकेत असल्याने त्यांना माहीत असते, ते त्या पद्धतीनेही दबाव आणू पाहतात.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्यू, पैठणची घटना
By City News Desk
अनोळखी पुरुषाकडून लिफ्ट घेणे महिलेला पडले महागात, वाळूजजवळ काय घडलं...
By City News Desk
Feature : अतिसारामुळे शरीर कमकुवत? आयुर्वेदिक उपायाने लगेच मिळेल आराम!
By City News Desk
Latest News
01 Aug 2025 07:26:26
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ४ वर्षे ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राजरोस संबंध ठेवले. तिने लग्नाची मागणी करताच संतापलेल्या प्रियकराने बेल्ट,...