मुलगा झाला, पैसे वाटप करताहेत, आजीबाई दागिने काढून ठेवा... दोन भामट्यांची कला अन्‌ आजीला १ लाख ८२ हजारांचा चुना!, चिकलठाण्याच्या मिनी घाटीसमोर काय घडलं...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एक व्यक्ती मुलगा झाल्याने पैसे वाटत असल्याचे सांगून दोन भामट्यांनी ६० वर्षीय महिलेचे दागिने हातचलाखीने लांबवले. ही घटना चिकलठाणा मिनी घाटीसमोर बुधवारी (२६ नोव्‍हेंबर) सकाळी ११ च्या सुमारास घडली. सिडको एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

गयाबाई कडुबा वेताळ (वय ६०, रा. चौधरी कॉलनी चिकलठाणा) यांनी याप्रकरणात तक्रार दिली आहे. त्या मुकुंदवाडी भाजीमंडीत भाजीपाला विकतात. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्या चिकलठाणा येथे पोस्ट ऑफिसमध्ये मुलीच्या खात्याचे पास बुक घेण्यासाठी गेल्या होत्या. तिथून घराकडे पायी येत असताना चौधरी कॉलनीकडे जाणाऱ्या रोडवर दोन अनोळखी व्यक्ती एकाचे वय अंदाजे ३० तर दुसऱ्याचे वय अंदाजे ४५ वर्षे असेल, ते गयाबाई यांच्याकडे आले. त्यातील एकाने पांढरे शर्ट घातलेले होते, तो म्हणाला, की मावशी इथे वयस्कर माणसाला अनुदान मिळत आहे.

त्यावर गयाबाईंनी त्याला कशाचे अनुदान, असे विचारले असता त्याने सांगितले की एका माणसाला मुलगा झाल्याने तो अनुदान देत आहे. तुम्ही माझ्यासोबत चला. त्यामुळे गयाबाई या त्याच्यासोबत गेल्या. मिनी घाटीच्या गेटजवळील झाडाखाली गयाबाईंना भामट्यांनी थांबवले. तेथे गरीब लोकांनाच अनुदान आहे. तुम्ही तुमचे दागिने तुमच्या पिशवीत काढून ठेवा. त्यामुळे गयाबाई यांनी पैसे ठेवलेल्या पाकिटात गळ्यातील सोन्याचे गंठण, कानातील झुंबर, वेल व हातातील अंगठी असे काढून ठेवले. निळ्या पिशवीत टाकले. त्यानंतर पहिल्या भामट्याने दागिने ठेवलेली पिशवी ही त्याच्याजवळ असलेल्या पांढऱ्या पिशवीत ठेवायला लावून ती पिशवी गयाबाई यांच्या हातात दिली. त्यानंतर ते दोघे भामटे निघून गेले. गयाबाईंनी पिशवी उघडून पाहिली असता पिशवी व दागिने ठेवलेले पाकीट दिसून आले नाही.

गयाबाई यांनी त्या दोघांचा आजूबाजूला शोध घेतला असता ते दोघेही त्यांना मिळून आले नाहीत. दोघांनी विश्वास संपादन करून न कळत दागिन्यांचे व पैशांचे पाकीट ठेवलेली पिशवी हातचलाखी करून घेऊन गेल्याचे गयाबाई यांच्या लक्षात आले. त्यांनी सिडको एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. भामट्यांनी गयाबाई यांचे ७५ हजार रुपयांचे १८ ग्रॅमचे सोन्याचे गंठण, ६० हजार रुपयांचे कानातील झुंबर व वेल, ४० हजार रुपयांचे ४ ग्रॅमची हातातील अंगठी, ७ हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ८२ हजार रुपयांचा ऐवज नेला. पोलिसांनी दोन्ही भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक कैलास लहाने करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना

Latest News

धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लग्नानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यावर डल्ला मारल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील...
३८ वर्षीय महिलेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, वाळूज MIDC तील घटना
तलावात पोहताना दोन मुलांचा बुडून मृत्यू, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दुर्घटना
करमाडजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : ट्रकने ५ कामगारांना उडवले, तिघांचा जागीच मृत्‍यू, २ गंभीर
वाळूज MIDC तील ठाकरे गटाच्या आंदोलनाला हिंसक वळण!; सोनवणेंना अक्षरशः ढकलत पोलिसांनी गाडीत बसवले, संतप्त नागरिकांनी मडके पोलिसांवर फेकले, हजार-दीड हजार लोकांचा पोलीस ठाण्याला घेराव
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software