अत्‍याचार करण्यास भावाला बळ देणाऱ्या PI विरुद्धही गुन्हा दाखल!; नागेश्वरवाडीत काय घडलं होतं?

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सातारा भागातील सर्वेश्वरनगरमध्ये २२ जुलैला सकाळी ९ च्या सुमारास एका पोलीस निरीक्षकाचा भाऊ संदीप लंके याने लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढवत दाम्‍पत्‍याला बेदम मारहाण केली होती. तुझ्या मुलीमुळे माझ्या मुलीची इज्‍जत गेली, असे म्‍हणत महिलेचे केस पकडून पायावर नाक घासून माफी मागायला लावली होती. या घटनेच्या आदल्या दिवशी रात्री संदीप लंके याने नागेश्वरवाडीत पीडित कुटुंबाचे दुकान गाठून धमकावले होते. यावेळी त्‍याने त्‍याच्या पीआय भावालाही कॉल लावून दिला होता. पीआय भावानेही धमकावले होते. क्रांती चौक पोलिसांनी आता पीआयविरुद्धही गुन्हा दाखल केला असून, संदीप लंकेसह त्‍याचा पीआय भाऊ आणि सोबत आलेला साथीदार अशा तिघांविरुद्ध रविवारी (२७ जुलै) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची गंभीर दखल राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली असून, तीन दिवसांत कठोर कारवाईचे आदेश विजय रहाटकर यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. त्‍यामुळे पोलिसांनी हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले असून, पीआयविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली आहे.

नागेश्वरवाडीत काय घडलं?
महापालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या ६८ वर्षीय वृद्धाने या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते नूर कॉलनी, जिल्हा परिषद क्वार्टरच्या बाजूला, नारळीबाग येथे पत्नीसह राहतात. नागेश्वरवाडीत ॲडव्हन्चर गेम झोन हे त्‍यांचे दुकान आहे. त्‍यांचा मुलगा दुकान सांभाळतो. २१ जुलैला रात्री साडेआठच्या सुमारास त्यांचा मुलगा दुकानावर असताना संदीप लंके व सोबत एक जण असे दोघे दुकानावर आले. रस्त्यावर उभे राहून लोकांसमोर संदीप लंके हा वृद्धाच्या मुलाला म्हणाला, की तुमची मुलगी व माझी मुलगी एकाच ट्युशनला आहे. त्या दोघींचे भांडण झाले आहे. त्यानंतर मुलाने लगेचच वडिलांना कॉल करून बोलावून घेतले.

वृद्ध दुकानात आल्यानंतर संदीप लंके याने सांगितले की, तुमची नात आणि माझी मुलगी यांचे ट्युशनमध्ये भांडण झाले आहे. त्यामुळे माझ्या मुलीला तुमच्या मुलीची माफी मागावी लागली. त्यामुळे माझ्या मुलीचा ट्युशनमध्ये अपमान झाला... त्यावर वृद्धाने त्याला समजावून सांगितले व म्हणाले, की मुलींचे भांडण आहे, होत असतात. त्यानंतर संदीप लंके याने माझा भाऊ बीड गेवराईला पीआय आहे, असे म्हणून त्याच्या भावाला फोन लावला आणि वृद्धाला बोलायला दिला. फोनवर तो अधिकारी वृद्धाशी बोलला व म्हणाला, की मी दोन-चार दिवसांनी आल्यावर तुम्हाला बघून घेईल.

फोन ठेवल्यावर संदीप लंके हा जातिवाचक शिवीगाळ करत म्हणाला, की माझे माझ्या भावाशी बोलणे झाले आहे. त्याने सांगितले की सर्वांना काय करायचे तू कर, मी बसलेलो आहे. मी बघून घेईन. त्यावर वृद्ध त्याला म्हणाला, की तुम्ही असे काय बोलता... तेव्हा संदीप लंके म्हणाला, की तुमच्या नातीला घेऊन या, मला तिला मारायचे आहे... असे म्हणून दोघे शिवीगाळ करत निघून गेले. त्‍यावरून वृद्धाने संदीप लंके, त्याचा पोलीस अधिकारी भाऊ आणि सोबत आलेला साथीदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस आयुक्‍त संपतराव शिंदे करत आहेत.

घटनेची पार्श्वभूमी...
साताऱ्यातील सर्वेश्वरनगरमधील ४५ वर्षीय व्यक्‍तीची मुलगी सानिका (नाव बदलले आहे) व लंकेची मुलगी एकाच ट्यूशन क्‍लासमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी सानिका आणि लंकेच्या मुलीचे भांडण झाले. शिक्षकांनी दोघींचा वाद मिटवला आणि मुली पुन्हा चुकीच्या वाटेवर जाऊ नयेत म्हणून लंकेच्या मुलीला सानिकाची सर्वांसमोर माफी मागायला लावली होती. यामुळे लंकेच्या मुलीच्या मनात लज्जा निर्माण झाली. तिने घरी आल्यावर पालकांना सांगितले. त्‍यामुळे लंकेचा राग अनावर झाला. २१ जुलैला रात्री धमकावल्यानंतर २२ जुलैला त्‍याची खुमखुमी पुन्हा उफाळून आली. सकाळी ९ लाच त्‍याने पत्‍नी आणि दोन साथीदारांसह सानिकाचे घर गाठले होते. सानिकाच्या आई-वडिलांना लोखंडी रॉड, लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली. सानिकाच्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर केस धरून लंकेच्या पत्नीच्या पायावर नाक घासून माफी मागायला लावली. सानिकाच्या वडिलांच्या संपूर्ण शरीरावर गंभीर वार केले. दाम्‍पत्‍याचा आक्रोश ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेत दाम्‍पत्‍याची सुटका केली. घटनेची माहिती कळताच सातारा पोलिसांनीही तिथे धाव घेतली होती.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

नवीनच... काय तर म्हणे महिला डॉक्‍टरने चिमटे घेतले!, चिकलठाण्याच्या मिनी घाटीत हे काय घडलं...

Latest News

नवीनच... काय तर म्हणे महिला डॉक्‍टरने चिमटे घेतले!, चिकलठाण्याच्या मिनी घाटीत हे काय घडलं... नवीनच... काय तर म्हणे महिला डॉक्‍टरने चिमटे घेतले!, चिकलठाण्याच्या मिनी घाटीत हे काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चिकलठाण्यातील मिनी घाटीत आगळावेगळाच प्रकार समोर आला आहे. तपासताना महिला डॉक्टरने चिमटे घेतल्याचा आरोप गर्भवतीने...
दोन संतापजनक घटना : साडी खरेदीस आलेल्या विवाहितेकडे पाहून सेल्समनचे अश्लील चाळे!, पैठण गेट भागातील घटनेने तणाव; टीव्ही सेंटर भागात विद्यार्थिनीचा पाठलाग करणाऱ्या दोन रोडरोमिओंना चोप!
पानदरिबा भागात तणाव : पोलिसांनी वेळीच धाव घेऊन परिस्थिती आणली नियंत्रणात, दंगा काबू पथक तैनात, नक्की काय झालं...
रेकॉर्डिंगसाठी मोबाइल ठेवून फार्मसीच्या २१ वर्षीय विद्यार्थिनीची किरायाच्या खोलीत आत्‍महत्‍या!, छत्रपती संभाजीनगर शहरातील धक्कादायक घटना
काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software