शहागंजमध्ये बॉम्बे फालुदा सेंटरसमोर राडा; ४-५ हातगाडीवाल्यांची दुकानमालकाला बेदम मारहाण

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : शहागंजमध्ये गांधीपुतळ्याजवळ बॉम्बे फालुदा सेंटरसमोर हातगाड्या लावण्यास दुकानमालकाने विरोध केल्याने ४ ते ५ हातगाड्यावाल्यांनी राडा केला. दुकानमालकाला बेदम मारहाण केली. यात दुकानमालक, त्याचा भाऊ आणि दुकानावरील नोकर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी (१० ऑक्‍टोबर) सायंकाळी घडली. सिटी चौक पोलिसांनी हल्लेखोर ५ जणांविरुद्ध शनिवारी (११ ऑक्‍टोबर) गुन्हा दाखल केला आहे.

व्यापारी खान हुजेफ अन्वर खान (वय २४, रा. किराडपुरा) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे.  त्यांचे शहागंज गांधीपुतळ्याजवळ बॉम्बे फालुदा सेंटर हे दुकान आहे. दुकानात त्यांचा भाऊ उवेज खान अन्वर खान मदतीला असून, सात ते आठ लोक कामावर ठेवले आहेत. दुकानासमोर मोठ्या प्रमाणात हातगाड्या लागतात. त्यामुळे दुकानात येणाऱ्या गिऱ्हाइकांना जाण्या- येण्यासाठी त्रास होतो. शुक्रवारी (१० ऑक्‍टोबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हुजेफ दुकानावर असताना दुकानासमोर मोईन, फरान, जाहेद, इरफान हे त्यांच्या हातगाडीवर चप्पलचा माल ठेवून विक्री करत होते. त्यामुळे हुजेफने त्यांना सांगितले, की तुम्ही हातगाड्या इथून काढा, वाहतूक कोंडी होत आहे. त्यावर मोईन, फरान, जाहेद, इरफान व एक अनोळखी यांनी आरडाओरडा करून हुजेफ यांच्या अंगावर धावून येत शिवीगाळ केली.

फरानने त्याच्या हातगाडीच्या छत्रीचा दांडा हातात घेऊन हुजेफ यांच्या डाव्या हातावर मारला. इरफाननेही छत्रीचा दांडा हातात घेऊन पोटरीवर मारहाण केली. उवेज खान व दुकानावरील कामगार सुनिल जैस्वाल हे भांडण सोडविण्यास आले असता त्यांनाही शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. हाणामारीत हुजेफ यांच्या गळ्यातील साडेसात ग्रॅमची सोन्याची चैन व शर्टच्या खिशातील ५ हजार रुपये पडून गहाळ झाले. हाणामारी होत असल्याचे कळताच पोलीस धावून आले. त्यानंतर मोईन, फरान, जाहेद, इरफान पळून गेले. घाटी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर हुजेफ यांनी सिटी चौक पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तपास पोलीस उपनिरीक्षक अजीत दगडखैर करत आहेत.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software