पोलिसांना पाहून पळणाऱ्याकडे आढळली गावठी बंदूक!, वाळूज एमआयडीसी पोलिसांची कामगिरी, साथीदार फरारी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील इंद्रप्रस्थ कॉलनीत पोलिसांनी एका युवकाला पकडून त्याच्याकडून गावठी कट्टा जप्त केला आहे. त्याचा साथीदार फरारी झाला आहे. ही कारवाई सोमवारी (१ डिसेंबर) रात्री ९ च्या सुमारास करण्यात आली.

योगेश लक्ष्मण गिराम (वय ३१, रा. शिक्षकनगर शिवनेरी कॉलनी रांजणगाव शेणपुंजी) असे पकडण्यात आलेल्याचे नाव असून, त्याचा साथीदार सचिन भुजंगराव मिसाळ (रा. ओमसाईनगर, रांजणगाव शेणपुंजी) हा फरारी झाला आहे. पोलीस अंमलदार सुरेश भिसे यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते विशेष पथकात कार्यरत आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाईसाठी पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील, पोलीस अंमलदार सुरेश भिसे, राजाराम वाघ, समाधान पाटील हे गस्त घालत होते.

रात्री ९ ला इंद्रप्रस्थ कॉलनीजवळ आकार टुल्स चौकात आले असता श्रीराम संस्थान कमान इंद्रप्रस्थ कॉलनीकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूला दोन युवक संशयास्पदरित्या उभे दिसले. पोलिसांनी त्यांच्याकडे धाव घेतली असता ते अंधाराचा फायदा घेऊन पळू लागले. त्यातील एकाला पोलिसांनी पकडले. त्याचे नाव विचारले असता त्याने योगेश गिराम सांगितले. त्याच्यासोबत असलेल्याचे नाव सचिन मिसाळ असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता जिन्स पँन्टच्या पुढील डाव्या खिशात १५ हजार रुपयांचा गावठी कट्टा मिळून आला. तो पोलिसांनी जप्त केला. योगेशविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. त्याच्या साथीदाराचा शोध घेतला जात आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्‍महत्‍या!

Latest News

जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्‍महत्‍या! जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्‍महत्‍या!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जाधववाडीतील स्वतःच्या दुकानात आंब्याचे व्यापारी आतिश हरिनारायण राठी (वय ४४, रा. सुराणानगर) यांनी शटर...
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!;  महसूल मंत्र्यांची घोषणा
चक्रावणारी घटना, दोन मित्र, कार, महिला, तिचे मित्र अन्‌ लूट... जयभवानीनगर ते सिडको चौकापर्यंत ते घडलं ते अचंबित करणारे... कसं घडलं ते विस्ताराने वाचा...
घर बांधणाऱ्या ठेकेदाराने कमालच केली, अर्धवट बांधकाम करून गेटला लावले स्वतःचे कुलूप!; दाम्पत्य हैराण-परेशान... मुकुंदवाडी पोलिसांत धाव!!
चोरट्यांनी हद्दच केली... चक्क न्यायाधीशांच्या बंगल्यावर डल्ला; सिडको एन ३ मधील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software