तूर्त रस्ता मोकळा करत आहोत, मालमत्तांची आवश्यकता भासल्यास भूसंपादन करू, हर्सूलकरांच्या याचिकेवर महापालिकेचे म्हणणे, खंडपीठाकडून याचिका निकाली

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महापालिका तूर्त मंजूर विकास आराखड्यानुसार ६० मीटर जागा मोकळी करत आहे. त्यामुळे मोबदल्याचा विषयच येत नाही. भविष्यात रस्ता तयार करताना मालमत्तांची आवश्यकता भासल्यास रीतसर भूसंपादन प्रक्रिया करू, असे म्हणणे महापालिकेने औरंगाबाद खंडपीठात मांडले. त्यानंतर खंडपीठाने याचिका निकाली काढली. 

हर्सूल येथील रस्ता ६० मीटर रूंद करण्यासाठी महापालिकेने केलेली घोषणा आणि बाधित करणाऱ्या मालमत्ता काढून घेण्याचे केलेले आवाहन याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात संदीप भगुरे आणि इतर १५ लोकांनी याचिका दाखल केली होती. न्या. मनीष पितळे आणि न्या. वाय जी. खोब्रागडे यांनी महापालिकेचे म्हणणे स्वीकारून मंगळवारी (२९ जुलै) याचिका निकाली काढली. अजिंठ्यासाठी हाच रस्ता असून, १९८२ मध्ये महापालिका अस्तित्वात आल्यानंतरच्या पहिल्या मंजूर विकास आराखड्यात तसेच २००२ च्या आणि आता मंजूर केलेल्या विकास आराखड्यातही हा रस्ता ६० मीटरचाच असल्याचे म्हणणे महापालिकेने मांडले. ताब्यावेळी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. जी २० परिषदेवेळी रस्ता रूंदीकरणानंतर मोबदला मिळाला होता. आता अतिक्रमण काढण्यासाठीची सूचना दिल्याने आमच्या मालमत्ता बाधित होत असून, मनपाने कायदेशीर भूसंपादन करून मोबदला द्यावा, मगच कारवाई करावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती.

७ दिवसांची अंतिम नोटीस
हर्सूल टी पॉइंट ते सावंगी मनपा हद्दीपर्यंत ६० मीटर रूंद रस्त्यासाठी बाधित होणारी धार्मिक स्थळे, कब्रस्तान, महापुरुषांचे पुतळे ७ दिवसांत स्वतःहून हटवावेत, अशी नोटीस महापालिकेच्या सहायक आयुक्तांनी मंगळवारी (२९ एप्रिल) बजावली. यापूर्वी १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. अद्याप बांधकाम काढण्यात आले नाही. त्यामुळे आता ७ दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली आहे. मुदतीत बांधकाम न हटवल्यास महापालिका स्वतः कारवाई करणार आहे. ही नोटीस हर्सूल, फुलेनगर येथील कब्रस्तानचे अध्यक्ष फारुख पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे अध्यक्ष मनोज जाधव यांच्यासह इतरांना देण्यात आली आहे.

२ ऑगस्टपासून वाळूजमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम
वाळूज एमआयडीसीत २ ऑगस्टपासून पाडापाडीला सुरुवात करण्यात येणार आहे. १२०० अतिक्रमणे आहेत. कारवाईसाठी ४ टीम करण्यात येणार आहे. प्रत्येकासोबत २ जेसीबी, २ ट्रक्टर, १ पोकलेन असेल. प्रत्येक टीमसोबत २० कर्मचारी असतील. त्याचबरोबर सुमारे १०० पेक्षा पोलिसांचा बंदोबस्त कारवाईसाठी तैनात असेल. कारवाईदरम्यान अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

नवीनच... काय तर म्हणे महिला डॉक्‍टरने चिमटे घेतले!, चिकलठाण्याच्या मिनी घाटीत हे काय घडलं...

Latest News

नवीनच... काय तर म्हणे महिला डॉक्‍टरने चिमटे घेतले!, चिकलठाण्याच्या मिनी घाटीत हे काय घडलं... नवीनच... काय तर म्हणे महिला डॉक्‍टरने चिमटे घेतले!, चिकलठाण्याच्या मिनी घाटीत हे काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चिकलठाण्यातील मिनी घाटीत आगळावेगळाच प्रकार समोर आला आहे. तपासताना महिला डॉक्टरने चिमटे घेतल्याचा आरोप गर्भवतीने...
दोन संतापजनक घटना : साडी खरेदीस आलेल्या विवाहितेकडे पाहून सेल्समनचे अश्लील चाळे!, पैठण गेट भागातील घटनेने तणाव; टीव्ही सेंटर भागात विद्यार्थिनीचा पाठलाग करणाऱ्या दोन रोडरोमिओंना चोप!
पानदरिबा भागात तणाव : पोलिसांनी वेळीच धाव घेऊन परिस्थिती आणली नियंत्रणात, दंगा काबू पथक तैनात, नक्की काय झालं...
रेकॉर्डिंगसाठी मोबाइल ठेवून फार्मसीच्या २१ वर्षीय विद्यार्थिनीची किरायाच्या खोलीत आत्‍महत्‍या!, छत्रपती संभाजीनगर शहरातील धक्कादायक घटना
काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software