कल्पनाचे अफगाणिस्तान कनेक्शन समोर येताच ATS, IB अलर्ट!; ६ महिने फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहताना खर्च केले ६ लाख!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जालना रोडवरील ॲम्बेसेडर फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये ३२२ रूम नंबरमध्ये तब्बल ६ महिन्यांपासून मुक्काम ठोकणाऱ्या ४५ वर्षीय कल्पना त्र्यंबकराव भागवत (रा. चिनारगार्डन, पडेगाव) हिच्या चौकशीत धक्कादायक खुलासे होत आहेत. तिने हॉटेल मुक्कामी काळात तब्बल पाच ते सहा लाख रुपये उडवले आहेत. तिचा बॉयफ्रेंड अशरफ खलील हा अफगाणिस्तानमध्ये वास्‍तव्यास असून, त्याचा भाऊ आबेद खलील पाकिस्तानमध्ये राहतो. दोघांच्या खात्यातून तिच्या खात्यात मोठ्या प्रमाणावर पैसे आले आहेत. त्यामुळे देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने आता या प्रकरणात एटीएस आणि आयबीनेही लक्ष घातले असून, दोन्ही यंत्रणांनी तिची कसून चौकशी सुरू केली आहे. कल्पना परदेशी गुप्तचर यंत्रणेसाठी काम करत असल्याचा संशय निर्माण झाला आहे.

पडेगाव येथील चिनार गार्डनमधील सी विंगमध्ये १३ नंबरच्या वन बीएचके फ्‍लॅटमध्ये कल्पना राहत होती. २००५ मध्ये तिच्या वडिलांनी हे घर खरेदी केले होते. तिचे वडील जिल्हा परिषद शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. कल्पना एमए उत्तीर्ण झालेली असून, अविवाहित आहे. वडिलांच्या पेन्शनचे पैसे आईमार्फत तिच्याकडे येतात. गेल्या वर्षात तिच्या खात्यावर ३२ लाख रुपये आले आहेत. मात्र आता केवळ ११०० रुपयेच शिल्लक असल्याचे तपासात समोर आले. तिच्या शिक्षण, प्रवास, बँक व्यवहाराची माहिती ठिकठिकाणी पत्रव्यवहार करून पोलिसांनी मागवली आहे, असे पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी सांगितले. ती २०१३ मध्ये विद्यापीठात तासिका तत्वावर नोकरीला होती. मात्र न सांगता गैरहजर राहिल्याने विद्यापीठाने तिला काढून टाकले होते. 

मोबाइलमध्ये राष्ट्रपतींसोबतचे फोटो
कल्पनाचा मोबाइल जप्त करण्यात आला असून, या मोबाइलमध्ये तिचे राष्ट्रपती, केंद्रीय गृहमंत्र्यांसोबतचे फोटो आहेत. यापूर्वी २०२१ मध्ये ती शरद पवार यांच्या ताफ्यात विनापरवाना शिरल्याने एटीएसने तिला ताब्यात घेतले होते. चौकशी करून सोडले होते. तिच्या मोबाइलमध्ये अफगाणिस्तानसह अन्य काही देशांतील फोन नंबर आहेत. त्यामुळे एटीएस, आयबी या तपास यंत्रणांनी तिची कसून चौकशी सुरू केली आहे. तिचा अफगाणिस्तानमधील बॉयफ्रेंड अशरफ हा काही दिवसांपूर्वी तिला शहरात येऊन भेटल्याचे तपासात समोर आले आहे. हॉटेलमध्ये राहत असताना ती स्टाफ किंवा हाऊसकिपिंगलाही आत येऊ देत नव्हती. पोलिसांनी तिच्या रूमची झडती घेतली तेव्हा कचरा व अस्वच्छता दिसून आली. 

म्हणे ॲड. निकम यांची नियुक्ती करा...
न्यायालयाने तिला २६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केलेली आहे. पोलीस कोठडीत कल्पना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलीसही थक्क आहेत. ती माझ्यासाठी ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा, असे म्हणत आहे. तिच्या घराची सोमवारी (२४ नोव्‍हेंबर) सिडको पोलिसांनी झाडाझडती घेतली. तिला घर झडतीसाठी घेऊन जातानाही मी पुढेच बसणार, असे फर्मान तिने पोलिसांना सोडले. त्यामुळे पोलिसांना डोक्यात हात लावण्याची वेळ आली.

काय आहे प्रकरण...
कल्पना भागवत ६ महिन्यांपासून जालना रोडवरील ॲम्बेसेडर या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्कामी थांबल्याची गोपनीय माहिती सिडको पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी हर्सूलच्या पोलीस निरीक्षक स्वाती केदार, सहायक पोलीस निरीक्षक अरुणा घुले, वर्षा काळे यांच्यासह हॉटेलमध्ये जाऊन शनिवारी (२२ नोव्‍हेंबर) कल्पनाला अटक केली. तिच्याविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यातील अंमलदार सतीश बोर्डे यांनी तक्रार दिली आहे. कल्पनाने हॉटेलमध्ये थांबण्यासाठी जे आधारकार्ड दिले होते, त्यावर खाडाखोड केल्याचे दिसून आले. तिच्याकडे केंद्रीय लोकसेवा आयोगातील २०१७ ची यादीही तिच्याकडे मिळाली. ही यादीही बनावट असल्याचे स्पष्ट झाले. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना

Latest News

धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लग्नानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यावर डल्ला मारल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील...
३८ वर्षीय महिलेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, वाळूज MIDC तील घटना
तलावात पोहताना दोन मुलांचा बुडून मृत्यू, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दुर्घटना
करमाडजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : ट्रकने ५ कामगारांना उडवले, तिघांचा जागीच मृत्‍यू, २ गंभीर
वाळूज MIDC तील ठाकरे गटाच्या आंदोलनाला हिंसक वळण!; सोनवणेंना अक्षरशः ढकलत पोलिसांनी गाडीत बसवले, संतप्त नागरिकांनी मडके पोलिसांवर फेकले, हजार-दीड हजार लोकांचा पोलीस ठाण्याला घेराव
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software