स्‍नॅपचॅटद्वारे लोकेशन शोधून चोरटे दिले पकडून!; चंपा चौकात आज पहाटे घडली घटना, तरुणाने मित्रांना सोबत घेऊन स्वतःच लावला छडा!!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पारंपरिक चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांना तंत्रज्ञान अवगत नसल्याने फसतात. असाच प्रकार आज, ४ डिसेंबरला पहाटे एकच्या सुमारास (मध्यरात्री) उध्दवराव पाटील चौकातील खुबा मशिदीसमोर घडला. चोरट्यांनी तरुणाचा मोबाइल हिसकावून पळ काढला. पण ते जिथे जात होते, तिथले सर्व लोकेशन तरुणाला कळत होते. तरुणाने मित्रांना सोबत घेऊन साजापूर येथील तुळजामाता पेट्रोलपंपाजवळ चोरट्यांना गाठले… […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पारंपरिक चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांना तंत्रज्ञान अवगत नसल्याने फसतात. असाच प्रकार आज, ४ डिसेंबरला पहाटे एकच्या सुमारास (मध्यरात्री) उध्दवराव पाटील चौकातील खुबा मशिदीसमोर घडला. चोरट्यांनी तरुणाचा मोबाइल हिसकावून पळ काढला. पण ते जिथे जात होते, तिथले सर्व लोकेशन तरुणाला कळत होते. तरुणाने मित्रांना सोबत घेऊन साजापूर येथील तुळजामाता पेट्रोलपंपाजवळ चोरट्यांना गाठले…

मोहंमद अदनान होसामी मोहंमद मसूद अन्सारी (वय २०, रा. चंपा चौक, एमएचबी कॉलनी)याने या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्‍याचे वडील डॉक्टर आहेत. तो कन्स्ट्रक्शनचे काम करतो. आज, ४ डिसेंबरला पहाटे एकच्या सुमारास (मध्यरात्री) उध्दवराव पाटील चौकातील खुबा मशिदीसमोर उभा राहून तो मोबाइलवर बोलत असताना अचानक काळ्या रंगाच्या युनिकॉर्न मोटरसायकलीवर ट्रिपलसीट बसून आलेल्या तिघा चोरट्यांनी त्‍याच्या हातातील मोबाईल हिसकावून भरधाव दिल्लीगेटच्या दिशेने निघून गेले. त्यानंतर अदनानने आरडाओरड करून मित्रांना बोलावले. त्‍यांच्या मोबाइल‌द्वारे अदनानच्या मोबाईलचे लोकेशन स्नॅपचॅटव्दारे तपासले असता ते साजापूर येथील तुळजामाता पेट्रोलपंपाचे दाखवत होते.

लगेचच अदनान आणि त्‍याचे मित्र शहजान पटेल, सयद अब्दुल्ला, शाहेद चारणीया, नोमान अन्सारी, हमजा सयद असे वाहनाने साजापूर येथे तुळजामाता पेट्रोलपंपाजवळ गेले. तिथे चोरटे युनिकॉर्न मोटारसायकलीसह (MH20 GJ1990) थांबलेले होते. अदनान आणि त्‍याच्या मित्रांनी लगेचच त्‍यांच्यावर झडप घातली. या झटापटीत एक चोरटा पळून गेला. दोन चोरट्यांना घेऊन अदनान आणि त्‍याचे मित्र सिटीचौक पोलीस ठाण्यात आले. पोलिसांनी त्‍यांचे नाव, पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे शुभम वसंत वैद्य (वय २१, रा. साजापूर ता. छत्रपती संभाजीनगर), सुमित सुभाष रुपेकर (वय १९, रा. साजापूर) असे सांगितले. त्यांच्यासोबत असलेल्या व पळून गेलेल्याचे नाव त्‍यांनी चेतन कुशवाहा असल्याचे सांगितले. दोन्ही चोरट्यांकडे अदनानचा १८ हजार रुपयांचा मोबाइल मिळून आला. पोलिसांनी तिन्ही चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भागवत मुठाळ करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

Tech News : उद्या, १ सप्टेंबरपासून पेटीएम बंद होणार आहे का? फोनवर नोटिफिकेशन, सोशल मीडियावर प्रश्नांचा वर्षाव...

Latest News

Tech News : उद्या, १ सप्टेंबरपासून पेटीएम बंद होणार आहे का? फोनवर नोटिफिकेशन, सोशल मीडियावर प्रश्नांचा वर्षाव... Tech News : उद्या, १ सप्टेंबरपासून पेटीएम बंद होणार आहे का? फोनवर नोटिफिकेशन, सोशल मीडियावर प्रश्नांचा वर्षाव...
पेटीएम वापरकर्त्यांना काळजी आहे की त्यांचे यूपीआय ३१ ऑगस्टपासून काम करणे थांबवू शकते. कारण गुगल प्लेने पाठवलेल्या एका नोटिफिकेशनमध्ये म्हटलेय...
Health News : जास्त वेळ बसण्याची सवय धूम्रपानाइतकीच हानिकारक
विशेष मुलाखतीत पल्लवी जोशी स्पष्टच बोलल्या : समस्या आपल्या आत आहेत, त्यात सुधारणा होणे गरजेचे, आपण वर्णद्वेषी अन्‌ लैंगिकतावादी!
संजयनगरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ८ जण पकडले
स्कुटीने शाळेत आली, स्कुटी पार्क केली नंतर गायब झाली दहावीत शिकणारी मुलगी!; केंब्रिज चौकाजवळील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software