सोन्याचा बनावट हार तारण ठेवून साडेचार लाखांचे गोल्ड लोन उचलण्याचा डाव फसला!; सिडकोतील केप्री फायनान्समधील प्रकार, दोघांना अटक

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नऊ तोळ्यांचा बनावट सोन्याचा लक्ष्मीहार तारण ठेवून साडेचार लाखांचे गोल्ड लोनची मागणी करण्याचा प्रकार समोर आला आहे. सिडको एन-७ येथील केप्री फायनान्सच्या व्यवस्थापकाने ही बनवेगिरी लगेच ओळखून पोलिसांना कळवले. सिडको पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (२७ ऑगस्ट) दुपारी अडीचला घडली. शेख अन्वर शेख मुसा (वय ३७, रा. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नऊ तोळ्यांचा बनावट सोन्याचा लक्ष्मीहार तारण ठेवून साडेचार लाखांचे गोल्ड लोनची मागणी करण्याचा प्रकार समोर आला आहे. सिडको एन-७ येथील केप्री फायनान्सच्या व्यवस्थापकाने ही बनवेगिरी लगेच ओळखून पोलिसांना कळवले. सिडको पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (२७ ऑगस्ट) दुपारी अडीचला घडली.

शेख अन्वर शेख मुसा (वय ३७, रा. हुसेननगर) व त्याला हार पुरवणारा त्याचा मित्र ज्ञानेश्वर कुलथे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शेख अन्वर केप्री फायनान्सच्या कार्यालयात आला. व्यवस्थापक ऋतुपर्ण टोनपे (वय ३३) यांच्याकडे त्याने ९२.९ ग्रॅम वजनाचे दोन लक्ष्मीहार ठेवून ५ लाखांच्या कर्जाची मागणी केली. टोनपे यांनी ऑडिटर योगेश चिमकर व व्हॅल्युअर महादेव उचे, आनंद नवपुते यांच्याकडे हार तपासणीसाठी दिले असता त्यांनी हार तपासून ४ लाख ५० हजारांचे कर्ज मंजूर होत असल्याचे सांगितले. अन्वरने तत्काळ होकार कळवला. कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडून परवानगी घेऊन त्याला पैसे देण्याची प्रक्रिया सुरूही केली.

मात्र, टोनपे यांना संशय आला. त्यांनी ऑडिटरला पुन्हा हार तपासण्याची सूचना केली असता हाराला वरून सोन्याचा मुलामा तर आत साधा धातू असल्याचे समोर आले. टोनपे यांनी सिडको पोलिसांना कळवले. आपले बिंग फुटल्याचे लक्षात येताच अन्वरने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्मचाऱ्यांनी पकडून ठेवले. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देवकाते यांनी त्याला ताब्यात घेतले. अधिक चौकशीत सराफा व्यावसायिक मित्र ज्ञानेश्वरने त्याला हा हार तयार करून दिल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी त्यालाही अटक केली. दोघांविरुद्ध यापूर्वीही फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल असून, मंगळवारी सकाळी त्यांनी आधी अन्य दोन फायनान्स कंपन्यांत बनावट हार देऊन पाहिला, पण तिथे त्‍यांचे प्रयत्न फसले. मग त्‍यांनी केप्री फायनान्स कंपनी निवडली होती.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना

Latest News

धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लग्नानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यावर डल्ला मारल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील...
३८ वर्षीय महिलेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, वाळूज MIDC तील घटना
तलावात पोहताना दोन मुलांचा बुडून मृत्यू, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दुर्घटना
करमाडजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : ट्रकने ५ कामगारांना उडवले, तिघांचा जागीच मृत्‍यू, २ गंभीर
वाळूज MIDC तील ठाकरे गटाच्या आंदोलनाला हिंसक वळण!; सोनवणेंना अक्षरशः ढकलत पोलिसांनी गाडीत बसवले, संतप्त नागरिकांनी मडके पोलिसांवर फेकले, हजार-दीड हजार लोकांचा पोलीस ठाण्याला घेराव
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software