- Marathi News
- सिटी क्राईम
- वासनांध सासरा, सुनेवर वाईट नजर… घरात एकटी पाहून केला लैंगिक अत्याचार!, फुलंब्रीची धक्कादायक घटना
वासनांध सासरा, सुनेवर वाईट नजर… घरात एकटी पाहून केला लैंगिक अत्याचार!, फुलंब्रीची धक्कादायक घटना
On

फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सासऱ्याने बलात्कार केल्याची घटना फुलंब्री पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात समोर आल्याने खळबळ उडाली. २५ डिसेंबरला घटना घडली होती, २० जानेवारीला या प्रकरणात फुलंब्री पोलिसांत तक्रार आली. त्यावरून नराधम सासऱ्यासह पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनकर संपत कदम असे संशयिताचे नाव आहे. दिनकर कदम […]
फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सासऱ्याने बलात्कार केल्याची घटना फुलंब्री पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात समोर आल्याने खळबळ उडाली. २५ डिसेंबरला घटना घडली होती, २० जानेवारीला या प्रकरणात फुलंब्री पोलिसांत तक्रार आली. त्यावरून नराधम सासऱ्यासह पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनकर संपत कदम असे संशयिताचे नाव आहे.
२५ डिसेंबरला सायंकाळी अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना दिनकरने तिच्यावर बलात्कार केला आणि सासरा-सुनेच्या नात्याला कलंक फासला. मुलीने घाबरून कुणाला काही सांगितले नाही. मात्र २० जानेवारीला आईकडे आल्यावर तिने घडला प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या आईने मुलीसह फुलंब्री पोलीस गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी सासरा दिनकर, पती समाधान व सासू चंद्रकला यांच्याविरुद्ध फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दिनकर व समाधानला अटक केली असून, मंगळवारी (२१ जानेवारी) फुलंब्री न्यायालयाने दोघांची हर्सूल कारागृहात रवानगी केली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Health News : जास्त वेळ बसण्याची सवय धूम्रपानाइतकीच हानिकारक
By City News Desk
संजयनगरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ८ जण पकडले
By City News Desk
मुकुंदवाडीतील बेपत्ता युवकाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ
By City News Desk
Latest News
31 Aug 2025 16:38:00
पेटीएम वापरकर्त्यांना काळजी आहे की त्यांचे यूपीआय ३१ ऑगस्टपासून काम करणे थांबवू शकते. कारण गुगल प्लेने पाठवलेल्या एका नोटिफिकेशनमध्ये म्हटलेय...