लव्हस्टोरीला वेगळे वळण : प्रेयसीने बलात्‍काराचा गुन्हा दाखल करताच प्रियकराचा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : प्रेमप्रकरण नकोसे झाल्यावर घरच्यांसोबत येऊन वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात बलात्‍काराची तक्रार प्रेयसीने केली. ही बाब प्रियकराला कळल्यानंतर त्‍याने विष पिऊन आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या प्रियकरावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रवी राजू मोरे (रा. आंबेलोहळ, ता. गंगापूर) असे या प्रियकराचे नाव आहे. १९ वर्षीय प्रेयसी गंगापूरची […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : प्रेमप्रकरण नकोसे झाल्यावर घरच्यांसोबत येऊन वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात बलात्‍काराची तक्रार प्रेयसीने केली. ही बाब प्रियकराला कळल्यानंतर त्‍याने विष पिऊन आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या प्रियकरावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रवी राजू मोरे (रा. आंबेलोहळ, ता. गंगापूर) असे या प्रियकराचे नाव आहे.

१९ वर्षीय प्रेयसी गंगापूरची असून, ती कुटुंबीयांसोबत राहते. ती छत्रपती संभाजीनगर शहरातील एका कॉलेजमध्ये शिकते. रवीने तिचा मोबाइल नंबर मिळवून संपर्क करत ओळख वाढवली. त्‍यानंतर दोघांत मैत्री झाली. तासन्‌तास एकमेकांसोबत बोलत होते. यादरम्‍यान दोघांत प्रेम झाले. दोघांच्या भेटीगाठी होऊ लागल्या. तो भेटायला तिच्या कॉलेज परिसरात गेला. भेटीचे फोटोही त्‍यांनी काढले. बजाजनगरच्या महाराणा प्रताप चौकातील रायगड लॉजवर तीनवेळेस दोघांत शारीरिक संबंधही आले. प्रेमाला चांगलेच उधाण आले असताना अचानक तिच्या स्वभावात बदल होऊन तिने बोलणे बंद केले.

तोपर्यंत प्रेमाच्या आहारी गेलेला रवी तिच्यासोबत बोलण्यासाठी धडपडू लागला. त्‍यासाठी दोघांत भांडणे होऊ लागली. त्‍याचा त्रास असह्य झाल्याने तिने पालकांना याची माहिती दिली. त्‍यानंतर पालकांसोबत येऊन वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी रवीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आपल्याविरुद्ध बलात्‍काराचा गुन्हा प्रेयसीने दाखल केल्याचे कळताच रवीने शनिवारी (२५ जानेवारी) राहत्‍या घरी विष पिले. त्‍याला अत्‍यवस्थ अवस्थेत कुटुंबीयांनी घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. त्‍याची प्रकृती नाजूक आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिडको एमआयडीसी ठाण्यात सराईत गुन्हेगाराशी पोलिसांची जोरदार झटापट; गुन्हेगाराने तोडफोड करत पोलिसांना केली बेदम मारहाण!, दोन पोलीस जखमी, गुन्हेगारही रक्‍तबंबाळ!!

Latest News

सिडको एमआयडीसी ठाण्यात सराईत गुन्हेगाराशी पोलिसांची जोरदार झटापट; गुन्हेगाराने तोडफोड करत पोलिसांना केली बेदम मारहाण!, दोन पोलीस जखमी, गुन्हेगारही रक्‍तबंबाळ!! सिडको एमआयडीसी ठाण्यात सराईत गुन्हेगाराशी पोलिसांची जोरदार झटापट; गुन्हेगाराने तोडफोड करत पोलिसांना केली बेदम मारहाण!, दोन पोलीस जखमी, गुन्हेगारही रक्‍तबंबाळ!!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नारेगाव येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणाऱ्या जनाजा मोर्चात गोंधळ घालणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला पोलिसांनी पकडून सिडको एमआयडीसी...
कब्रस्तानच्या जागेसाठी निघालेला मोर्चा गरवारे चौकात पोलिसांनी अडवला, मोर्चा काढणाऱ्यांना अटक, पावणेदोनशे लोकांविरुद्ध गुन्हा दाखल
लव्हस्टोरी ते हेटस्टोरी : प्रियकराचा लग्‍नासाठी हट्ट, तिला आई-वडिलांची चिंता, अखेर गळफास घेऊन संपवला किस्सा!, सिडको एन ७ मधील कल्याणीच्या आत्‍महत्‍येप्रकरणी प्रियकर सूरज मोरेविरुद्ध गुन्हा दाखल
२५ वर्षीय विशालचा घात की अपघात?, वडोद बाजार पोलिसांकडून चौकशी सुरू, फुलंब्री तालुक्‍यात नक्की काय घडलं...
सैराट पार्ट २ : आधी हॉस्पिटलसमोरून पळवले होते, पोलिसांनी पकडून आणले, आता पुन्हा घरातून प्रेयसीला नेले... मुलगी दहावीत शिकते, मुलगा २१ वर्षांचा, बजाजनगरातील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software