शैलेश दौंड मर्डर मिस्ट्री उलगडली : दारूला पैसे दिले नाही म्‍हणून फरशीच्या तुकड्याने ठेचून खून केला; मारेकरी तरुणांची कबुली

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शैलेशने दारू पिण्यास पैसे न दिल्याने त्याचा फरशीच्या तुकड्याने ठेचून खून केल्याची कबुली दोघा मारेकऱ्यांनी दिली. योगेश शिवलिंग कल्याणकर (वय २१, रा. रंगारगल्ली, नांदेड, ह.मु. बजाजनगर) व त्याच्या अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. मारेकऱ्यांनी वडगाव कोल्हाटीच्या खदान परिसरात शैलेश विठ्ठल दौंड (वय ३१, रा. महादेव मंदिर परिसर, बजाजनगर) याचा […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शैलेशने दारू पिण्यास पैसे न दिल्याने त्याचा फरशीच्या तुकड्याने ठेचून खून केल्याची कबुली दोघा मारेकऱ्यांनी दिली. योगेश शिवलिंग कल्याणकर (वय २१, रा. रंगारगल्ली, नांदेड, ह.मु. बजाजनगर) व त्याच्या अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. मारेकऱ्यांनी वडगाव कोल्हाटीच्या खदान परिसरात शैलेश विठ्ठल दौंड (वय ३१, रा. महादेव मंदिर परिसर, बजाजनगर) याचा मृतदेह फेकला होता. शुक्रवारी (१२ जुलै) सकाळी सातला ही घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती.

असे शोधले मारेकरी…
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फूटेजची तपासणी केली. रांजणगाव शेणपुंजीसह बजाजनगर, पंढरपूर, वडगाव, सिडको वाळूज महानगर, जोगेश्वरी आदी ठिकाणी पथके रवाना करीत तसेच तंत्रज्ञानाच्या मदतीने मारेकऱ्यांचा शोध सुरू ठेवला. दरम्यान, गुप्त बातमीदाराने मारेकऱ्यांची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी वडगाव कोल्हाटीतून योगेश कल्याणकर व त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. त्‍यांनी पोलिसांकडे खुनाची कबुली दिली. त्‍यांनी सांगितले की, शैलेश आमच्या ओळखीचा होता. गुरुवारी रात्री आम्ही शैलेशकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र त्याने नकार दिला. त्‍यामुळे आम्ही दोघांनी त्याला आम्हीच तुला दारू पाजतो, असे म्हणून वडगाव कोल्हाटीच्या खदानीजवळ नेले. तेथे शैलेशसोबत वाद झाला. त्‍यामुळे आम्ही दोघांनी त्याला बेदम मारहाण केली. शैलेश खाली पडल्यानंतर त्याच्या डोक्यात व चेहऱ्यावर फरशीच्या तुकड्याने सपासप वार करून त्याचा खून केला.

उद्यापर्यंत पोलीस कोठडी…
योगेश कल्याणकरला न्यायालयात हजर केले असता त्याला १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्‍याच्‍या अल्पवयीन साथीदाराला बाल न्यायालयात हजर केले जाणार आहे, असे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी सांगितले. खुन्यांना पकडण्याची कामगिरी पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त नितीन बगाटे, सहायक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, अशोक इंगोले, सहायक फौजदार विलास वैष्णव, दिलीप बन, पोलीस अंमलदार बाळासाहेब आंधळे, संदीप गाडगे, अरुण उगले, नवाब शेख, यशवंत गोबाडे, गणेश सागरे, हनुमान ठोके, सुरेश भिसे, नितीन इनामे, समाधान पाटील, बाळासाहेब देवबोने, लखन गुसिंगे, राजाभाऊ कोल्हे, पंकज साळवे, योगेश गुमलाडू, जालिंदर वाखुरे, प्रशांत सोनवणे, बबलू थोरात, सुरेश कचे यांनी पार पाडली.

महिलांनी पाहिला सर्वात आधी मृतदेह…
कंपनीत कामाला जाणाऱ्या काही महिलांना शुक्रवारी सकाळी सातला मृतदेह दिसला होता. साईनगर सिडको ते वडगाव गट नंबरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर खदानीलगत ३० ते ३५ वर्षे वयाच्या तरुणाचा हा मृतदेह पाहताच त्‍यांनी घाबरून त्‍यांच्या पतीला कळवले होते. मृतदेहाजवळ कुठलेच कागदपत्र नसल्याने ओळख पटणे अवघड जात होते. त्‍याच्या हातावर आई गोंदलेले होते. पोलिसांनी सरपंच सुनील काळे यांना बोलावले. मृतदेह आढळल्‍याची बातमी संपूर्ण वडगाव कोल्हाटीसह बजाजनगरात पसरल्याने मृतक शैलेशचे नातेवाईकही पाहायला आले. मृतदेह शैलेशचा असल्याचे पाहून त्‍यांनी एकच आक्रोश केला. शैलेशचे वडीलही आले होते. त्‍यांनी माझा मुलगा म्‍हणत हंबरडा फोडला होता. शैलेश आई, वडील, पत्‍नीसोबत राहत होता. तो एमबीए झालेला होता. वाळूज एमआयडीसीतील एका नामांकीत कंपनीत एचआर विभागात काम करत होता. त्‍याच्या पगारातून घर चालायचे. मात्र काही कारणांमुळे शैलेश एक महिन्यापासून घरीच होता. त्‍यामुळे आर्थिक अडचणीत सापडला होता. त्‍याचे वडील एफडीसी कंपनीत कामाला आहेत, तर आई घरीच असते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

Tech News : उद्या, १ सप्टेंबरपासून पेटीएम बंद होणार आहे का? फोनवर नोटिफिकेशन, सोशल मीडियावर प्रश्नांचा वर्षाव...

Latest News

Tech News : उद्या, १ सप्टेंबरपासून पेटीएम बंद होणार आहे का? फोनवर नोटिफिकेशन, सोशल मीडियावर प्रश्नांचा वर्षाव... Tech News : उद्या, १ सप्टेंबरपासून पेटीएम बंद होणार आहे का? फोनवर नोटिफिकेशन, सोशल मीडियावर प्रश्नांचा वर्षाव...
पेटीएम वापरकर्त्यांना काळजी आहे की त्यांचे यूपीआय ३१ ऑगस्टपासून काम करणे थांबवू शकते. कारण गुगल प्लेने पाठवलेल्या एका नोटिफिकेशनमध्ये म्हटलेय...
Health News : जास्त वेळ बसण्याची सवय धूम्रपानाइतकीच हानिकारक
विशेष मुलाखतीत पल्लवी जोशी स्पष्टच बोलल्या : समस्या आपल्या आत आहेत, त्यात सुधारणा होणे गरजेचे, आपण वर्णद्वेषी अन्‌ लैंगिकतावादी!
संजयनगरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ८ जण पकडले
स्कुटीने शाळेत आली, स्कुटी पार्क केली नंतर गायब झाली दहावीत शिकणारी मुलगी!; केंब्रिज चौकाजवळील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software