पारदेश्वर मंदिरात दर्शन घेऊन घरी येताना वृद्धाला दुचाकीने उडवले, जागीच मृत्‍यू

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पारदेश्वर मंदिरात दर्शन घेऊन घराकडे पायी परतणाऱ्या ६१ वर्षीय वृद्धाला भरधाव दुचाकीने उडवले. यात वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (२८ जून) सकाळी पळशी शिवारातील पारदेश्वर मंदिर परिसरात घडली. देविदास बाजीराव मगर (ह.मु. पिसादेवी परिसर, मूळगाव निल्लोड, ता. सिल्लोड) असे मृत्‍यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ते नियमितपणे सकाळी मंदिरात दर्शनाला […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पारदेश्वर मंदिरात दर्शन घेऊन घराकडे पायी परतणाऱ्या ६१ वर्षीय वृद्धाला भरधाव दुचाकीने उडवले. यात वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (२८ जून) सकाळी पळशी शिवारातील पारदेश्वर मंदिर परिसरात घडली.

देविदास बाजीराव मगर (ह.मु. पिसादेवी परिसर, मूळगाव निल्लोड, ता. सिल्लोड) असे मृत्‍यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ते नियमितपणे सकाळी मंदिरात दर्शनाला येत होते. त्यांना मूलबाळ नसल्याने पिसादेवी परिसरातील पुतणे कैलास मगर यांच्याकडे राहत होते. दर्शन घेऊन परतताना दुचाकीने धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. नातेवाईक व नागरिकांनी तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी चिकलठाणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक समाधान पवार करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना

Latest News

धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लग्नानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यावर डल्ला मारल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील...
३८ वर्षीय महिलेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, वाळूज MIDC तील घटना
तलावात पोहताना दोन मुलांचा बुडून मृत्यू, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दुर्घटना
करमाडजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : ट्रकने ५ कामगारांना उडवले, तिघांचा जागीच मृत्‍यू, २ गंभीर
वाळूज MIDC तील ठाकरे गटाच्या आंदोलनाला हिंसक वळण!; सोनवणेंना अक्षरशः ढकलत पोलिसांनी गाडीत बसवले, संतप्त नागरिकांनी मडके पोलिसांवर फेकले, हजार-दीड हजार लोकांचा पोलीस ठाण्याला घेराव
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software