रत्‍नाकर नवले छत्रपती संभाजीनगर शहराचे नवे पोलीस उपायुक्‍त, ATS ची धुरा बजरंग बनसोडे यांच्याकडे

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पोलीस अधीक्षक आणि अप्पर अधीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्‍य शासनाने केल्या असून, यात छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस उपायुक्‍तपदी मुंबईतील ‘फोर्स वन’चे अप्पर पोलीस अधीक्षक रत्नाकर नवले यांची बदली झाली आहे. आधी त्‍यांची बदली अमरावतीला झाली होती, ती रद्द करून छत्रपती संभाजीनगरला ते नियुक्‍त झाले. छत्रपती संभाजीनगरच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पोलीस अधीक्षक आणि अप्पर अधीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्‍य शासनाने केल्या असून, यात छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस उपायुक्‍तपदी मुंबईतील ‘फोर्स वन’चे अप्पर पोलीस अधीक्षक रत्नाकर नवले यांची बदली झाली आहे. आधी त्‍यांची बदली अमरावतीला झाली होती, ती रद्द करून छत्रपती संभाजीनगरला ते नियुक्‍त झाले.

छत्रपती संभाजीनगरच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) अधीक्षकपदी बजरंग बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या बदल्यांतमध्ये एक अदलाबदलही करण्यात आली असून, त्‍यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांची राज्य गुप्तवार्ता विभागाच्या (एसआयडी) उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. आधीच्या बदल्यांमध्ये त्‍यांची नियुक्‍ती कोल्हापूरला गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पोलीस अधीक्षकपदी झाली होती, तर रत्‍नागिरीच्या अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांची छत्रपती संभाजीनगरला राज्‍य गुप्तवार्ता विभागाच्या उपायुक्‍तपदी बदली करण्यात आली होती. आता जयश्री गायकवाड यांची बदली कोल्हापूरमध्ये गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधीक्षकपदी करण्यात आली आहे.

नवले शहराचे नवे पोलीस उपायुक्‍त
पोलीस उपायुक्त नवनीत काँवत आणि नितीन बगाटे यांच्या बदलीनंतर छत्रपती संभाजीनगर शहरातील उपायुक्तांचे पद रिक्त झाले होते. मुंबईतील फोर्स वनचे अप्पर पोलीस अधीक्षक रत्नाकर नवले हे आता शहराचे नवे पोलीस उपायुक्‍त झाले आहेत. आता शहरात पंकज अतुलकर, प्रशांत स्वामी, शर्मिष्ठा घारगे-वालावलकर आणि रत्नाकर नवले असे ४ पोलीस उपायुक्त झाले आहेत. शर्मिष्ठा घारगे आणि रत्‍नाकर नवले हे अद्याप रूजू झालेले नसल्याची माहिती अधिकारिक सूत्रांनी दिली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर

Latest News

चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्याचा हप्ता खात्यात जमा झाल्याचा संदेश लवकरच त्यांच्या...
जायकवाडी धरण तुडूंब भरताच विसर्ग सुरू, जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन
मॅरिड असूनही प्रेमाचा अट्टहास, तिला पती सोडायला लावून दुसरे लग्‍न केले, आता तिला एकीकडे म्हणतो ‘फालतू’; दुसरीकडे सांगतो, माझे अनेकींशी लफडे!!; लासूरस्टेशनच्या ३१ वर्षीय युवतीची पोलिसांत तक्रार
ऑगस्टमधील पहिला प्रदोष व्रत ६ की ७ ऑगस्टला? पूजा करण्याची तारीख, मंत्र आणि पद्धत जाणून घ्या
नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू, पैठणची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software