नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू, पैठणची घटना

On

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : झोक्यावरून पडून आपेगाव (ता. पैठण) येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (२९ जुलै) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. अंकुश एकनाथ कापसे (रा. आपेगाव) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

नागपंचमीचा सण असल्याने शेतातील झाडाला बांधलेला झोका अंकुश कापसे खेळत होते. झोका खेळताना अचानक त्यांचा हात सुटला. ते जमिनीवर जोरात पडून बेशुद्ध झाले. कुटुंबीयांनी त्यांना पैठण येथील सरकारी रुग्णालयात आणले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. पैठणचे पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, अंमलदार नुसरत शेख यांनी तातडीने घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पैठण पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

दोघांना घरात कोंडले, लोक यायचे अन्‌ मारहाण करून जायचे!; धावणी मोहल्ल्यात काय घडलं, मोहम्मदने तक्रारीत मांडलं...

Latest News

दोघांना घरात कोंडले, लोक यायचे अन्‌ मारहाण करून जायचे!; धावणी मोहल्ल्यात काय घडलं, मोहम्मदने तक्रारीत मांडलं... दोघांना घरात कोंडले, लोक यायचे अन्‌ मारहाण करून जायचे!; धावणी मोहल्ल्यात काय घडलं, मोहम्मदने तक्रारीत मांडलं...
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महिलेची छेड काढत पर्स चोरून पळालेल्या तरुणाला मारहाण होत असताना वाचवणे दोन तरुणांना चांगलंच महागात...
फायनान्सच्या गुंडांनी गरवारे स्टेडियमजवळ तरुणाला लुटले!
केवळ सांगाडा उभारला, पत्रे टाकणे बाकीच, शिवाजीनगर भुयारी मार्गातून आजपासून वाहतूक सुरू, आता मध्यरात्री काम करण्याच्या सूचना
जिल्ह्यात २ भीषण अपघात  : कचनेरला ट्रक उलटून चालकाचा तर सिल्लोडजवळ उभ्या टँकरला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्‍यू, शिऊरच्या तरुणावर मध्यप्रदेशात काळाचा घाला
प्रेयसीला बेल्ट, कुऱ्हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण!, ४ वर्षांपासून 'लिव्ह इन'मध्ये राहतात, लग्‍नाची मागणी करताच प्रियकर बनला हैवान!!, वाळूज MIDC तील धक्कादायक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software