- Marathi News
- जिल्हा न्यूज
- अनोळखी पुरुषाकडून लिफ्ट घेणे महिलेला पडले महागात, वाळूजजवळ काय घडलं...
अनोळखी पुरुषाकडून लिफ्ट घेणे महिलेला पडले महागात, वाळूजजवळ काय घडलं...
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अनोळखी पुरुषाला लिफ्ट मागणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. पेट्रोल संपल्याचे सांगून गाडी थांबवत महिलेला उतरवले, हातातील पिशवी महिलेकडे देत गळ्यातील ८५ हजारांचे दागिने हिसकावून दुचाकीस्वाराने धूम ठोकली. हा प्रकार मंगळवारी (२९ जुलै) सायंकाळी साडेसहाला वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लिंबेजळगाव टोलनाक्याजवळ घडली. संशयित जालिंदर गोरख चव्हाण (वय २५, रा. वजनापूर ता. गंगापूर) याला वाळूज पोलिसांनी अटक केली आहे. त्याने गंगापूर तालुक्यातही असाच कारनामा केल्याचे समोर येत आहे.
ऊर्मिला रावसाहेब दुशिंग (वय ५०, रा. एम-८, म्हाडा कॉलनी, तिसगाव) यांनी वाळूज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्या वाळूजला जाण्यासाठी बसची वाट पाहत होत्या. त्यावेळी मोटारसायकलीवरून आलेल्या युवकाने त्यांच्याजवळ गाडी थांबवली आणि मी वाळूजलाच चाललो आहे, असे म्हणत त्यांना गाडीवर बसवले. त्याच्यावर विश्वास ठेवून ऊर्मिला दुचाकीवर बसल्या. काही अंतरावर त्याने गाडी थांबवली आणि पेट्रोल संपल्याचे सांगत जवळची पिशवी खाली ठेवून ही पिशवी धरा, मी गाडी सुरू करतो, असे सांगितले. त्यावर ऊर्मिला दुशिंग या पिशवी उचलण्यासाठी वाकल्या असता त्याने सोन्याचे अंदाजे ६५ हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. ऊर्मिला यांच्या तक्रारीवरून वाळूज पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संशयित जालिंदर चव्हाणला बुधवारी (३० जुलै) पकडून अटक केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे करीत आहेत.
गंगापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी (२९ जुलै) दुपारी दीडच्या सुमारास वैजापूरला जाण्यासाठी बिजलाबाई हरिभाऊ पवार (वय ६५, रा. खंडोबा मंदिराजवळ, सातारा, छत्रपती संभाजीनगर) या बसची वाट पाहत होत्या. त्यांना जालिंदर गोरख चव्हाण (वय २५, रा. वजनापूर ता. गंगापूर) याने मीदेखील वैजापूरला जात आहे. आजी तुम्ही माझ्या गाडीवर वैजापूरला चला, मी तुम्हाला सोडतो, असे म्हणून आपल्या मोटारसायकलीवर बसविले. त्यानंतर वैजापूर मार्गावरील वडगाव पाटीच्या पुढे नरहरी रांजणगाव कमानीजवळ निर्जन ठिकाणी मोटारसायकल थांबवली. वृद्धेच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची पोत व डोरले असा एकूण ६० हजारांचा ऐवज हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी बिजलाबाई पवार यांच्या तक्रारीवरून जालिंदर चव्हाणविरुद्ध शिल्लेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जालिंदर चव्हाणने चोरी केल्याची कबुली दिली आहे. तपास पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार विनोद बिघोत करत आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्यू, पैठणची घटना
By City News Desk
अनोळखी पुरुषाकडून लिफ्ट घेणे महिलेला पडले महागात, वाळूजजवळ काय घडलं...
By City News Desk
Latest News
01 Aug 2025 12:04:59
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मोटारसायकलीचे हप्ते थकले, असे म्हणत फायनान्स कंपनीच्या गुंडांनी तरुणाला गरवारे स्टेडियमजवळ सिनेस्टाइल लुटले. धमक्या देत...