मॅरिड असूनही प्रेमाचा अट्टहास, तिला पती सोडायला लावून दुसरे लग्‍न केले, आता तिला एकीकडे म्हणतो ‘फालतू’; दुसरीकडे सांगतो, माझे अनेकींशी लफडे!!; लासूरस्टेशनच्या ३१ वर्षीय युवतीची पोलिसांत तक्रार

On

गंगापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : गंगापूर तालुक्‍यातील लासूरस्टेशन येथील ३१ वर्षीय विवाहितेने शिल्लेगाव पोलीस ठाण्यात धक्कादायक तक्रार केली आहे. मॅरिड असूनही प्रेमाचा अट्टहास करत तिला आधी पती सोडायला लावला. नंतर तिला धमकावत इच्छेविरुद्ध तिच्याशी दुसरे लग्‍न केले. आता पैशांसाठी तिला छळत असून, तिला एकीकडे फालतू म्हणतो, तर दुसरीकडे स्वतःचे अनेकींशी लफडे असल्याची कबुलीही देतो... या तक्रारीवरून शिल्लेगाव पोलिसांनी लासूरस्टेशनमधील तिच्या या दुसऱ्या पतीसह त्‍याच्या ४ नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लासूरगाव रोडवरील महावीरनगरात राहणाऱ्या पूजा (नाव बदलले आहे) हिने या प्रकरणात तक्रार दिली आहे. ती घरकाम करून उदरनिर्वाह करते. तिचे पहिले लग्न २००६ मध्ये कन्‍नड तालुक्‍यातील तरुणासोबत झाले होते. मात्र काही दिवसांतच दीपक (नाव बदलले आहे) तिच्या सासरी आला आणि तिच्या पतीला धमकावले, की मला पूजासोबत विवाह करायचा असून, तू तूझ्या पत्नीला फारकती दे. त्यामुळे तिच्या पतीने तिला फारकत दिली आणि माहेरी पाठवून दिले लासूरस्टेशनच्या अशोक कॉलनीत राहणाऱ्या दीपकने तिला धमकी दिली, की तू जर माझ्यासोबत लग्न केले नाही तर मी तुला मारून टाकेन.

त्यामुळे पूजाने यांनी सन २००८ मध्ये तिची इच्छा नसतानाही दीपकसोबत लग्न केले. दीपकला पहिली पत्नी असून  त्यांना मूलही असल्याचे पूजाला आधी सांगण्यात आले नव्हते. दीपकने तिला सांगितले, की तुझ्यासारख्या किती तरी जणींसोबत माझे लफडे आहेत. त्यानंतर पूजाला दीपक वारंवार मारहाण करू लागला. पैशांची मागणी करू लागला. त्यामुळे पूजाने आईला सांगितले. पूजाच्या आईने बचतगट काढून १ लाख ३० हजार रुपये पूजाकडे दिले. ते पूजाने दीपकला दिले. मात्र काही दिवसांनी पुन्हा दीपक तिला मारहाण करून पैशांची मागणी करु लागला. तिच्या दोन मुलांचे आधार कार्ड अजूनही बनवलेले नाही.

तिला दीपकचे अशोक कॉलनीतीलच ४ नातेवाइकही सतत मारहाण करून शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी देतात. पैसे आणून दिले नाही तर तिला फालतू आहे, असे बोलतात, असे तक्रारीत म्‍हटले आहे. पूजा कामाला गेली, की दीपकची पहिल्या पत्नीची मुलगी त्या ठिकाणी येऊन पूजाला कामाहून काढून टाकायला लावते. सर्व लोक शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास देत असल्याचे पूजा यांनी तक्रारी म्हटले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार रविकुमार कीर्तीकर करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शताब्‍दीनगरात राडा : दोन भावांवर तलवारीचे वार, पोलिसांनी धावून गंभीर जखमींना केले घाटीत दाखल

Latest News

शताब्‍दीनगरात राडा : दोन भावांवर तलवारीचे वार, पोलिसांनी धावून गंभीर जखमींना केले घाटीत दाखल शताब्‍दीनगरात राडा : दोन भावांवर तलवारीचे वार, पोलिसांनी धावून गंभीर जखमींना केले घाटीत दाखल
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शताब्‍दीनगरात बुधवारी (३१ जुलै) रात्री १० च्या राडा झाला. कुत्रे...
दोघांना घरात कोंडले, लोक यायचे अन्‌ मारहाण करून जायचे!; धावणी मोहल्ल्यात काय घडलं, मोहम्मदने तक्रारीत मांडलं...
फायनान्सच्या गुंडांनी गरवारे स्टेडियमजवळ तरुणाला लुटले!
केवळ सांगाडा उभारला, पत्रे टाकणे बाकीच, शिवाजीनगर भुयारी मार्गातून आजपासून वाहतूक सुरू, आता मध्यरात्री काम करण्याच्या सूचना
जिल्ह्यात २ भीषण अपघात  : कचनेरला ट्रक उलटून चालकाचा तर सिल्लोडजवळ उभ्या टँकरला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्‍यू, शिऊरच्या तरुणावर मध्यप्रदेशात काळाचा घाला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software