बिबट्या बेतलाय जिवावर… गंगापूर तालुक्‍यातील ३ गावांतील शेतकरी, नागरिक धास्तावले

On

गंगापूर (गणेश म्‍हैसमाळे : सीएससीएन वृत्तसेवा) : गेल्या १५ दिवसांपासून गंगापूर तालुक्‍यातील माहुली, मांजरी कान्होबावाडी शिवारात दोन बिबट्यांनी कहर केला आहे. कुत्रे, पाळीव प्राण्यांचा फडशा पाडण्याबरोबरच शेतकऱ्यांवरही बिबट्यांनी हल्ला केला आहे. त्‍यामुळे शेतकरी घाबरून गेले आहेत. जीव मुठीत घेऊनच शेतात जात आहेत, घराबाहेर पडत आहेत. मुलांना शाळेत पाठवतानाही त्‍यांना धास्ती बसत आहे. वनविभागाने तातडीने ही […]

गंगापूर (गणेश म्‍हैसमाळे : सीएससीएन वृत्तसेवा) : गेल्या १५ दिवसांपासून गंगापूर तालुक्‍यातील माहुली, मांजरी कान्होबावाडी शिवारात दोन बिबट्यांनी कहर केला आहे. कुत्रे, पाळीव प्राण्यांचा फडशा पाडण्याबरोबरच शेतकऱ्यांवरही बिबट्यांनी हल्ला केला आहे. त्‍यामुळे शेतकरी घाबरून गेले आहेत. जीव मुठीत घेऊनच शेतात जात आहेत, घराबाहेर पडत आहेत. मुलांना शाळेत पाठवतानाही त्‍यांना धास्ती बसत आहे. वनविभागाने तातडीने ही बिबट्याची जोडी पकडून न्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

रविवारी (२२ जून) रात्री बिबट्यांनी कचरू कारभारी सुराशे यांच्या बकरीचा फडशा पाडल्याचे आज, २३ जूनला समोर आले. कचरू मिसाळ यांच्या शेतात आज संध्याकाळी ४.३० च्या सुमारास ही बिबट्याची जोडी दिसल्याचे शेतकऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर सिटी न्‍यूजला सांगितले. बकरी, वासरे, कुत्र्यांचा फडशा पाडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कान्होबावाडीत जिल्हा परिषद शाळा असून, शाळेत आजूबाजूची लहान मुले पायी जातात. बिबट्यांमुळे त्‍यांच्याही जिवाला धोका निर्माण झाला आहे. पालक मुलांना शाळेत पाठविण्यास कचरत आहेत.

बिबट्यांचा बंदोबस्त करावा, असे शेतकऱ्यांनी म्‍हटले आहे. तुकाराम निकम, गोरखनाथ मिसाळ, राजेंद्र मिसाळ, इंद्रनाथ मिसाळ, बाबासाहेब मिसाळ, काकासाहेब शिगाडे, बाबासाहेब शिगाडे, विक्रम कोल्हे, दादासाहेब सुराशे, ज्ञानेश्वर सुराशे, सीताराम सुराशे, पंढरीनाथ साळुंके, भागीनाथ टेमकर, सीताराम नेटके, कडूभाऊ लांडे, बाळासाहेब शिगाडे, अलीम शेख, अहमद शेख, हारुण शेख, गणेश कोल्हे, काकासाहेब मिसाळ, गणेश बनसोडे, दिलीप मिसाळ, भाऊसाहेब लोहकरे, बबन लोहकरे, सुभाष लोहकरे, भगवान लांडे, शेख हुजेफ अमीन, सलमान शेख आदी शेतकऱ्यांनी बिबट्यांच्या भीतीने वनविभागाला साकडे घातले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर

Latest News

चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्याचा हप्ता खात्यात जमा झाल्याचा संदेश लवकरच त्यांच्या...
जायकवाडी धरण तुडूंब भरताच विसर्ग सुरू, जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन
मॅरिड असूनही प्रेमाचा अट्टहास, तिला पती सोडायला लावून दुसरे लग्‍न केले, आता तिला एकीकडे म्हणतो ‘फालतू’; दुसरीकडे सांगतो, माझे अनेकींशी लफडे!!; लासूरस्टेशनच्या ३१ वर्षीय युवतीची पोलिसांत तक्रार
ऑगस्टमधील पहिला प्रदोष व्रत ६ की ७ ऑगस्टला? पूजा करण्याची तारीख, मंत्र आणि पद्धत जाणून घ्या
नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू, पैठणची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software