२३ वर्षीय तरुणीचे अपहरण करून रात्रभर चालत्या गाडीत बलात्कार, पहाटे रस्त्यावर फेकले, लोणावळ्यात खळबळ

On

पुणे (सीएससीएन न्यूजडेस्क) : पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे एक खळबळजनक घटना समोर आली आहे. २३ वर्षीय तरुणीचे अपहरण करून चालत्या गाडीत तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिला रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आले. ही घटना शनिवारी (२६ जुलै) पहाटे समोर आली. या प्रकरणात लोणावळा पोलिसांनी एका ३५ वर्षीय पुरुषाला अटक केली आहे. तरुणीने पोलिसांना सांगितले की कारमध्ये तिघे होते. ते तिला अनेक ठिकाणी घेऊन गेले आणि तिच्यावर वारंवार बलात्कार केला.

लोणावळा शहर पोलिसांनी सांगितले, की लोणावळ्यातील तुंगार्ली येथील नारायणीधामक मंदिरापासून तरुणी रात्री नऊच्या सुमारास पायी चालली होती. कारमधून आलेल्या ३ व्यक्‍तींनी अडवले. तोंड दाबून कारमध्ये कोंबले. तिचे हात पाठीमागे बांधून तिचा मोबाइल काढून घेतला. नंतर तिचे कपडे काढून विवस्‍त्र करत मारहाण करत तिच्यावर शनिवारी पहाटेपर्यंत सामूहिक लैंगिक अत्‍याचार करत राहिले. नंतर नांगरगाव येथील रस्‍त्‍याच्या कडेला टाकून दिले.

पोलिसांनी तुंगार्ली येथील एका ३५ वर्षीय पुरुषाला अटक केली आहे. तरुणी तुंगार्ली परिसरातच राहते. पीडितेच्या दाव्यांची पडताळणी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, तरुणीने सुरुवातीला असा दावा केला होता की तीन पुरुषांनी तिला जबरदस्तीने कारमध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केला, परंतु तपासादरम्यान असे आढळून आले की कारमध्ये फक्त एकच व्यक्ती होती. तपासात असेही समोर आले की तो तरुणीला ओळखत होता. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता

Latest News

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज, ३१ जुलैला निकाल दिला आहे. १७ वर्षांनंतर...
घरी बसून करा हजारो रुपयांचे मोफत फेशियल!; सगळे तुम्हाला विचारतील, तुमच्या चमकत्या त्वचेचे रहस्य काय?
Feature : अतिसारामुळे शरीर कमकुवत? आयुर्वेदिक उपायाने लगेच मिळेल आराम!
रत्नाकर फायनान्समधून महिलांना अश्लील कॉल!; जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, कसे येतात कॉल, कुठून मिळवतात नंबर, जाणून घेऊ...
मोबदला न देता मालमत्ता पाडाल तर सामूहिक आत्‍मदहन करू!;  हर्सूलवासियांचा पवित्रा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software