पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांत माझ्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत टवाळखोराने साथीदारांसोबत मिळून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला चढवला. यात तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मुकुंदवाडी पोलिसांनी हल्लेखोरांच्या मुसक्या सोमवारी (९ मार्च) पहाटे आवळल्या.

पवन पांडुरंग शेजूळ (वय २४, रा. गेट नं. ५६, राजनगर मुकुंदवाडी) याने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तो आई व बहिणीसह राहतो. खासगी कंपनीत काम करतो. शुक्रवारी (६ मार्च) रात्री ८ च्या सुमारास तो घरात बसलेला असताना ओळखीचा कृष्णा कांबळे त्याच्याकडे आला. म्हणाला, की तुला शुभम काकडे याने रेल्वे पटरीजवळ बोलविले आहे. त्यामुळे पवन रेल्वेपटरीजवळ गेला असता शुभम काकडे, आकाश जाधव उभे होते. शुभमच्या हातात लोखंडी रॉड होता. तू माझ्याविरुध्द पोलीसात साक्ष का दिली, असे म्हणून शुभम काकडे पवनला शिवीगाळ करू लागला.

आकाश जाधव व कृष्णा कांबळे यांनी मोठमोठे दगड उचलून पवनला मारण्यास सुरुवात केली. शुभमने लोखंडी रॉड पवनच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. तो वार पवनने डाव्या हाताने अडवला. यात डाव्या हाताच्या बोटाला गंभीर जखम झाली. कृष्णा व आकाश दगडाने डोक्यात व उजव्या हातावर मारून पवनला गंभीर जखमी केले. शुभमने तोंडावर बुक्का मारून दात पाडला. शुभम, आकाश व कृष्णा हे तिघेही गेट नं. ५६ राजनगर मुकुंदवाडी येथे राहत असल्याचे पवनने तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पुष्पा बोचरे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 

Latest News

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना  पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांत माझ्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत टवाळखोराने साथीदारांसोबत मिळून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी...
शू रॅकमध्ये फ्‍लॅटची चावी ठेवणे पडले महागात, १ लाख ८० हजारांच्या साहित्यावर चोरट्याचा डल्ला!; सुराणानगरातील घटना
कंडोम पॅकिंग मशीन देण्याच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा!; वाळूज MIDC तील घटना
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्‍महत्‍या!
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!;  महसूल मंत्र्यांची घोषणा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software