एमआयएमला कोणत्या चमत्काराची अपेक्षा?, ७० विरुद्ध ३३, गणित जुळणार कसं??, ठाकरे गट, वंचित, दोन्ही काँग्रेस सोबत आले तरी जुळणार नाही बहुमताचे गणित!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : युतीकडे ७० नगरसेवकांचे (भाजप ५७, शिंदे गट १३) बळ असतानाही एमआयएमने जणू चमत्कार होण्याच्या अपेक्षेने महापौर, उपमहापौरपदासाठी उमेदवार दिले आहेत. केवळ निवडणूक बिनविरोध होऊ नये, यासाठीच हा खटाटोप एमआयएमने केल्याचे दिसून येत आहे. भाजपचे समीर राजूरकर आणि शिंदे गटाचे राजेंद्र जंजाळ यांच्या निवडीची औपचारिकता मंगळवारी (१० फेब्रुवारी) पार पडणार आहे. समीर राजूरकर शहराचे २३ वे महापौर होतील.

एमआयएमकडे ३३ नगरसेवक असून, त्यांनी महापौरपदासाठी अशोक हिवराळे आणि उपमहापौरपदासाठी मोहम्मद वसीम अहमद हे उमेदवार उभे केले आहेत. एमआयएमच्या मदतीला बाकीचे सर्व पक्ष (ठाकरे गट ६, वंचित बहुजन आघाडी ४, राष्ट्रवादी शरद पवार गट १, काँग्रेस १) आले तरी, ४५च नगरसेवक होतील. विजयी होण्याचे गणित जुळणार नाही, हे नक्कीच आहे. त्यामुळेच ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी किंवा शरद पवार गट, काँग्रेस यांनी एमआयएमशी याबाबत चर्चाही केलेली नाही.

१० फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता महापालिकेच्या प्रबोधनकार ठाकरे सभागृहात निवडणूक होईल. पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी काम पाहतील. सुरुवातीला उमेदवारांच्या अर्जांची छाननी होईल. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी देण्यात येईल. महापौर, उपमहापौरपदांसाठी निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांची नावे मराठी वर्णानुक्रमाने घोषित करण्यात येतील. ज्या उमेदवाराचे नाव पुकारण्यात येईल, त्या उमेदवाराच्या समर्थनार्थ नगरसेवकांना हात उंचावून मतदान करावे लागणार आहे. ही अशी पहिलीच निवडणूक हो आहे, ज्यात घोडेबाजार होण्याची गरज पडली नाही.

ऐतिहासिक क्षणासाठी महापालिका सज्ज
नव्या प्रशासकीय इमारतीतील अत्याधुनिक सभागृहात विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे. नव्या महापौरांसाठी नवीन गाऊन आणि राजदंड तयार केलेला आहे. चोपदारासाठीही नवीन टोपी, ब्लेड आणि गणवेश तयार ठेवला आहे. सध्या प्रकाश राजपूत हे चोपदार म्हणून कार्यरत आहेत. २०१८-१९ पासून ते ही जबाबदारी सांभाळत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software