गारखेड्यातील श्री गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी उसळली गर्दी, मध्यरात्रीनंतर १ पर्यंत राहणार मंदिर खुले, दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त गारखेड्यातील गजानन महाराज मंदिर आज, ८ फेब्रुवारीला २१ तास दर्शनासाठी खुले असणार आहे. मंदित प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. ५५० सेवेकरी भाविकांच्या सेवेत असणार आहे. मंदिरात दर्शनासाठी सकाळपासून भाविकांची गर्दी होत आहे.

पहाटे ४ वाजता मंदिराचे दरवाजे उघडले असून, मध्यरात्री १ पर्यंत मंदिर उघडे राहील. दरवर्षी प्रकट दिनी श्रींचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक शहर, जिल्ह्यातून येतात. दर्शव व प्रसाद घेऊन जातात. यंदा भाविकांना नामजपात सहभागी करून  घेण्यासाठी कडा ऑफिस मैदानावर सकाळी ११ ते दुपारी १२ दरम्यान सहस्त्रनाम जप करण्याचा निर्णय विश्वस्तांनी घेतला आहे.  पहाटे ४ वाजता श्रींना अभिषेक घालण्यात आला. सकाळी ७ वाजता सामूहिक आरती झाली. सकाळी ११ वाजता  यज्ञाची पूर्णाहुती देण्यात येणार असून, ११ ते दुपारी १२ वा.  सहस्त्रनामाचा जप होणार आहे. सकाळी ११.३० पासून महाप्रसाद वाटपाला सुरुवात होईल. सायंकाळी ६ वाजता विशेष आरती होणार आहे.

हर्सूलच्या मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह
हर्सूलच्या जळगाव रोडवरील श्रींच्या मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. आज, ८ फेब्रुवारीला सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान हभप ज्ञानेश्वर कुकलारे महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल.
खंडोबा मंदिरात दर रविवारी महाप्रसाद वाटप
सातारा गावातील श्री क्षेत्र खंडोबा मंदिरात या वर्षीपासून दर रविवारी भाविकांच्या वतीने अन्नदानाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे खंडोबा मंदिराच्या समितीच्या वतीने सांगण्यात आले. आज अन्नदानाचा पहिला रविवार आहे. ज्या भाविकांना खंडोबा मंदिर येथे अन्नदान करण्याची इच्छा आहे, त्यांनी मंदिर समितीकडे नोंदणी करावी, असे आवाहन केले आहे. दुपारी १२ पासून महाप्रसाद चालू होईल. तीन वाजेपर्यंत भाविकांना महाप्रसाद वाटप होईल.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software