शहानूरवाडीतील श्री जगदंबा गॅस एजन्सीला २ चालकांचा दणका, गॅसच्या २०० टाक्या नेल्या चोरून

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहानूरवाडीतील श्री जगदंबा गॅस एजन्सीला २ चालकांनी मोठा दणका दिसला आहे. कमर्शियल गॅसच्या २०० टाक्या (१४० रिकाम्या, ६० भरलेल्या) चोरून नेल्या असून, मोबाइल बंद करून गायब आहेत. एजन्सीमालक महिलेने शोधाशोध केल्यानंतर अखेर शुक्रवारी (६ फेब्रुवारी) सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून चालकांचा शोध सुरू केला आहे.

gas chori
हेच ते संशयित चोर.

अंबिका विलासराव पाटील (वय २८,रा. एन ८ सिडको) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्या HPCL कमर्शियल गॅसची श्री जगदंबा गॅस एजन्सी शहानूरवाडी बीड बायपास येथे चालवतात. त्यांच्याकडे एक ट्रक, लोडींग रिक्षा व जितो छोटा आहे. त्यावर चालक म्हणून अय्याज शब्बीर शेख व जिशान शेख (रा. माणिकनगर, नारेगाव) दोन वर्षांपासून आहेत. बुधवारी (२ फेब्रुवारी) सकाळी १० ला पाटील यांना ग्राहकाचा कॉल आला, की आम्हाला आज गॅसच्या टाक्या पोहचल्या नाहीत. त्यामुळे पाटील यांनी चालक अय्याज व जिशान यांना वारंवार कॉल केले.  मात्र त्यांचे फोन बंद येत होते. ट्रक सिपेट ग्राउंड येथे उभा केला जातो.

त्यामुळे पाटील या सीपेट ग्राउंड येथे गेल्या. तेथे ट्रक (MH 04 FD 5575) उभा दिसला. मात्र ट्रकमध्ये असलेल्या गॅसच्या १३० टाक्या दिसून आल्या नाहीत. पाटील यांनी अय्याजच्या घरी जाऊन विचारपूस केली, तेव्हा अय्याज व जिशान घरी मिळून आले नाहीत. ट्रकमधील टाक्या अय्याज व जिशानने चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. गॅस एजन्सीच्या कार्यालयासमोरील लोडिंग रिक्षा व जितो रिक्षातील एकूण ६० भरलेल्या टाक्या व १० रिकाम्या टाक्याही दिसूल आल्या नाहीत. पाटील यांच्या अॅक्टिवा स्कुटीची (MH 20 AZ 1077) बॅटरी व ट्रकची बॅटरी व चाव्याही दिसून आल्या नाहीत. यानंतर पाटील यांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. ४ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल अय्याज व जिशान यांनी चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार चंदनसिंग उसारे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या जस्ट पॅक इंडस्ट्रीज कंपनीला भीषण आग

Latest News

मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या जस्ट पॅक इंडस्ट्रीज कंपनीला भीषण आग मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या जस्ट पॅक इंडस्ट्रीज कंपनीला भीषण आग
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाढेगाव येथील जस्ट पॅक इंडस्ट्रीज या पेपर रोल तयार करणाऱ्या...
मस्ती भोवली!; इसे बोलते है ट्रिगर...तान दिया, ट्रिगर दबाया... और खेल... बंदुकीतून गोळी सुटून मित्र गंभीर जखमी!, वाळूजमधील थरार, पोलीस चौकशीत बिंग फुटले 
CTET देण्यासाठी आलेल्या शिक्षिकांचे CBSE ने मंगळसूत्र उतरवले!; छत्रपती संभाजीनगरमधील प्रकाराने संताप उसळला!!
आई, वडिलांनंतर आता भाऊसुद्धा नियतीने हिरावला!, बहिणीकडे राहणाऱ्या हर्सूलच्या गणेशचा पिकअपने घेतला बळी!!
एमआयएमला कोणत्या चमत्काराची अपेक्षा?, ७० विरुद्ध ३३, गणित जुळणार कसं??, ठाकरे गट, वंचित, दोन्ही काँग्रेस सोबत आले तरी जुळणार नाही बहुमताचे गणित!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software