आई, वडिलांनंतर आता भाऊसुद्धा नियतीने हिरावला!, बहिणीकडे राहणाऱ्या हर्सूलच्या गणेशचा पिकअपने घेतला बळी!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव पिकअपने नोकरीच्या ठिकाणी निघालेल्या दुचाकीस्वार युवकाला धडक दिली. यात युवकाचा उपचारादरम्यान शुक्रवारी (६ फेब्रुवारी) सकाळी साडेअकराच्या सुमारास मृत्‍यू झाला. ही घटना ईएसआय ऑफिस वखार्ड चिकलठाणा रोडवर घडली.

गणेश विश्वंभर बोकन (वय ३०, ह. मु. कुंभार गल्ली हर्सूल, रा. नागेश कॉलनी अहमदपूर जि. लातूर) असे मृत्‍यू झालेल्या युवकाचे नाव आहे. दिनेश धोंडीबा मैड (वय ४०, रा. हरिओमनगर, सावंगी, ह. मु. कुंभार गल्ली हर्सूल) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते बजरंग चौकातील सपना सुपर मार्केटमध्ये काम करतात. त्यांची पत्नी वैशालीचे भाऊ गणेश दोन वर्षांपासून त्यांच्याकडेच राहण्यास होते. त्यांच्या आई- वडिलांचे पाच वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. २७ जानेवारीला सकाळी सव्वा आठच्या सुमारास गणेश प्रोझोन मॉलमध्ये कामाला असल्याने कामावर जाण्यासाठी मोटारसायकलीने (MH 20 HF 2643) निघाला होता.

सकाळी सव्वानऊच्या सुमारास दिनेश मैड यांना मोबाइलवर एका व्यक्तीने कॉल करून सांगितले, की तुमच्या नातेवाइकाचा ईएसआय ऑफिस वखार्ड चिकलठाणा रोडवर अपघात झाल्याने त्याला MGM हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. दिनेश यांनी लगेचच एमजीएम रुग्णालयात धाव घेतली. गणेशला अॅडमिट केलेल्या लोकांनी सांगितले, की सकाळी ९ च्या सुमारास तुमच्या नातेवाइकाच्या मोटारसायकलला पिकअप वाहनाने (MH 20 GC 9946) भरधाव येऊन जोरात धडक दिली. गणेशच्या डोक्याला, उजव्या पायाला, उजव्या खांद्याला, छातीला व पोटाला मार लागल्याने तो आयसीयू वॉर्डामध्ये बेशुध्दावस्थेत दाखल होता. त्याची प्रकृती आणखीनच खालावल्याने गणेशला ५ फेब्रुवारीला घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर ट्रामा केअर येथे उपचार चालू असताना शुक्रवारी (६ फेब्रुवारी) सकाळी साडेअकराच्या सुमारास गणेशचा मृत्‍यू झाला. सिडको एमआयडीसी पोलिसांनी पिकअपचालकाविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या जस्ट पॅक इंडस्ट्रीज कंपनीला भीषण आग

Latest News

मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या जस्ट पॅक इंडस्ट्रीज कंपनीला भीषण आग मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या जस्ट पॅक इंडस्ट्रीज कंपनीला भीषण आग
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाढेगाव येथील जस्ट पॅक इंडस्ट्रीज या पेपर रोल तयार करणाऱ्या...
मस्ती भोवली!; इसे बोलते है ट्रिगर...तान दिया, ट्रिगर दबाया... और खेल... बंदुकीतून गोळी सुटून मित्र गंभीर जखमी!, वाळूजमधील थरार, पोलीस चौकशीत बिंग फुटले 
CTET देण्यासाठी आलेल्या शिक्षिकांचे CBSE ने मंगळसूत्र उतरवले!; छत्रपती संभाजीनगरमधील प्रकाराने संताप उसळला!!
आई, वडिलांनंतर आता भाऊसुद्धा नियतीने हिरावला!, बहिणीकडे राहणाऱ्या हर्सूलच्या गणेशचा पिकअपने घेतला बळी!!
एमआयएमला कोणत्या चमत्काराची अपेक्षा?, ७० विरुद्ध ३३, गणित जुळणार कसं??, ठाकरे गट, वंचित, दोन्ही काँग्रेस सोबत आले तरी जुळणार नाही बहुमताचे गणित!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software