आ. विलास भुमरेंनी चक्क लेकाला नेले मतदान केंद्रात, ईव्हीएम मशीनजवळ अन्‌ लेकाच्या बोटालाही शाई लावून घेतली...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठणचे आ. विलास भुमरे यांनी आपल्या लहान मुलासह मतदान केंद्रात प्रवेश केला. मतदान यंत्राजवळ नेले, तेथील कर्मचाऱ्याकडून मुलाच्या बोटाला शाईदेखील लावून घेतली. या धक्कादायक प्रकाराची गंभीर दखल जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतली असून, चौकशीचे आदेश दिले आहेत. केंद्राध्यक्षांसह संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले आहेत.

आ. भुमरे यांचे चुलत बंधू शिवराज भुमरे पाचोड गटात शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत. मतदानासाठी गेलेल्या आ. भुमरे यांनी आपल्या मुलाला सोबत नेले होते. त्यांनी मुलाला ईव्हीएम मशीन जवळ उभे केले. नंतर वडिलांच्या बोटाला शाई लावत असल्याचे पाहून मुलानेही बोट पुढे केले तेव्हा महिला कर्मचाऱ्याने नियमांचे उल्लंघन करून चक्क मुलाच्या बोटाला शाई लावली. या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल होत असून, आ. भुमरे यांच्यावर टीका होत आहे. निवडणूक विभागाच्या कार्यपद्धतीवरही आक्षेप घेतला जात आहे.

दरम्यान, या घटनेबाबत खा. संदीपान भुमरे यांना विचारले असता त्यांनी अजब उत्तरे दिली. मुले मग घरी ठेवायची का, कुटुंबासह मतदानाला लोक येत नाहीत का, असे सुरुवातीला सांगून त्यांनी समर्थन करण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर घटनेचे गांभीर्य पत्रकारांच्या बोलण्यातून लक्षात आल्यावर त्यांनी मी तिथे नव्हतो, मला या घटनेबद्दल काहीही माहिती नाही. माहिती घेतो, असे ते म्हणाले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. ते म्हणाले की, प्रकार अतिशय गंभीर असून, मतदान केंद्रातील गोपनीयतेचा आणि नियमांचा भंग झाला आहे. पूर्ण चौकशी करून कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. काही ठिकाणी मतदान यंत्र बंद पडल्याच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या असून मतदान कोठेही थांबणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याचे जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शहानूरवाडीतील श्री जगदंबा गॅस एजन्सीला २ चालकांचा दणका, गॅसच्या २०० टाक्या नेल्या चोरून

Latest News

शहानूरवाडीतील श्री जगदंबा गॅस एजन्सीला २ चालकांचा दणका, गॅसच्या २०० टाक्या नेल्या चोरून शहानूरवाडीतील श्री जगदंबा गॅस एजन्सीला २ चालकांचा दणका, गॅसच्या २०० टाक्या नेल्या चोरून
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहानूरवाडीतील श्री जगदंबा गॅस एजन्सीला २ चालकांनी मोठा दणका दिसला आहे. कमर्शियल गॅसच्या २००...
आ. विलास भुमरेंनी चक्क लेकाला नेले मतदान केंद्रात, ईव्हीएम मशीनजवळ अन्‌ लेकाच्या बोटालाही शाई लावून घेतली...
जाधववाडी बाजार समितीतील हर्राशी ठप्प, शेतकऱ्यांची कोंडी!; हमाल-व्यापाऱ्यांतील भांडण पेटले...
छत्रपती संभाजीनगर शहरात कुठेही कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही, तिसरा डोळा टिपणार, जबर दंड लागणार...
बजाजनगरात मतदान केंद्रावर १०० मीटरच्या नियमावरून गोंधळ; पोलिसांचा हस्तक्षेप, चौघांना बोगस मतदानाच्या संशयावरून पकडले!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software