मस्ती भोवली!; इसे बोलते है ट्रिगर...तान दिया, ट्रिगर दबाया... और खेल... बंदुकीतून गोळी सुटून मित्र गंभीर जखमी!, वाळूजमधील थरार, पोलीस चौकशीत बिंग फुटले 

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : काही वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या वास्तव चित्रपटातील संजय दत्तच्या डायलॉगची पुन्हा आठवण येईल, असा थरारप्रसंग वाळूजमध्ये समोर आला आहे. इसे बोलते है मॅगझिन, और इसे बोलते है ट्रिगर, इसपे ऐसी उंगली रखी, और तान दिया जिसपे तानना है, ट्रिगर दबाया और खेल खल्लास... असे संजय दत्त त्या चित्रपटातील सीनमध्ये म्हटला होता. दोन मित्रांमध्येही अशीच काहीसी मस्ती सुरू असताना एकाने दुसऱ्यावर पिस्तुल रोखले आणि गोळी झाडली. यात मित्र गंभीर जखमी झाला. त्याला नंतर ज्याने गोळी झाडली, त्यानेच घाटी रुग्णालयात दाखल केले. नंतर आम्ही दुचाकीने येत असताना कुणीतरी गोळी झाडली, ही बनवाबनवी मात्र वाळूज पोलिसांनी ओळखली आणि या दोन मित्रांचे बिंग फुटले...

महेश दत्तात्रय पवार (वय २३, रा. बजाजनगर, वाळूज एमआयडीसी परिसर) असे गोळी लागून जखमी झालेल्याचे नाव असून, त्याच्यावर गोळी झाडणाऱ्याचे नाव अझहर शफी सय्यद (वय ४०, रा. अन्सार कॉलनी, सरोज स्कूलशेजारी, पडेगाव) असे आहे. अझहरला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडील पिस्तुल आणि त्यातील ३ जीवंत काडतुसे जप्त केली आहेत.

नक्की काय घडलं?
पोलीस उपनिरीक्षक वंदना मुळे यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्या कर्तव्यावर असताना शनिवारी दुपारी १२ ला घाटी पोलीस चौकीतील पोलीस अंमलदार ए. आर. खिल्लारे यांनी त्यांना गोळी लागलेल्या अवस्थेत महेशला अझहरने घाटी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली. अझहरने डॉक्टरांना सांगितले होते, की आम्ही दोघे रात्री सव्वा अकराच्या सुमारास लिंबेजळगाव टोलनाका ते वाळूजदरम्यान ढोरेगाव फाट्याजवळून मोटारसायकलीने जात असताना कोणीतरी आमच्यावर गोळीबार केला. त्यात माझ्या मित्राला गोळी लागली. घटनेचे गांभीर्य ओळखून डॉक्टरांनी घाटी पोलीस चौकीला कळवले.

घाटी पोलीस चौकीतून घटनेबाबत कळताच वाळूजचे पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे, पोलीस उपनिरीक्षक वंदना मुळे, पोलीस अंमलदार गफ्फार शेख, राजपूत यांचे पथक घाटीत गेले. डॉक्टरांनी तो जबाब देण्याच्या स्थितीत असल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी महेश व त्याच्यासोबत असलेल्या अझहरकडे चौकशी केली. त्यावर दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. शितोळे यांच्या नजरेतून अझहरचा बनाव सुटला नाही. दोघेही काहीतरी लपवत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी अझहरला वाळूज पोलीस ठाण्यात आणले.

अझहरने तोंड उघडले...
अझहरकडे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे यांनी कसून चौकशी केली. त्यावर अझहरने सांगितले, की माझा मृत भाऊ इम्रान सय्यद याने आणलेले पिस्तुल व त्यात असलेले ४ राऊंड सोबत घेऊन वाळूज येथील शिवराई फाटा येथील सपना हॉटेलशेजारी मोकळ्या जागेत मी आणि महेश बसलेलो होतो. पिस्तुल पाहत असताना माझ्याकडून पिस्तुलमधील एक गोळी फायर झाली. ती गोळी महेशच्या उजव्या पायाच्या मांडीत घुसली. त्यामुळे त्याला मी घाटी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी अझहरच्या पडेगाव येथील घरी जाऊन झडती घेतली. घराबाहेरील निळ्या ड्रममध्ये ३० हजार रुपयांचे गावठी पिस्तुल व त्यातील ३ हजार रुपयांचे ३ राउंड मिळून आले. ते जप्त करण्यात आले. या घटनेमुळे शस्त्र खरेदी -विक्रीचे मोठे रॅकेट असण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे, पोलीस उपनिरीक्षक वंदना मुळे, पोलीस अंमलदार गफ्फार शेख, विजय पिंपळे, सुधाकर पाटील, नितीन धुळे, श्री. राजपूत यांनी केली. त्यांना पोलीस मित्र किशोर गाडेकर व अमन शेख यांनी मदत केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे करीत आहेत. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या जस्ट पॅक इंडस्ट्रीज कंपनीला भीषण आग

Latest News

मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या जस्ट पॅक इंडस्ट्रीज कंपनीला भीषण आग मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या जस्ट पॅक इंडस्ट्रीज कंपनीला भीषण आग
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाढेगाव येथील जस्ट पॅक इंडस्ट्रीज या पेपर रोल तयार करणाऱ्या...
मस्ती भोवली!; इसे बोलते है ट्रिगर...तान दिया, ट्रिगर दबाया... और खेल... बंदुकीतून गोळी सुटून मित्र गंभीर जखमी!, वाळूजमधील थरार, पोलीस चौकशीत बिंग फुटले 
CTET देण्यासाठी आलेल्या शिक्षिकांचे CBSE ने मंगळसूत्र उतरवले!; छत्रपती संभाजीनगरमधील प्रकाराने संताप उसळला!!
आई, वडिलांनंतर आता भाऊसुद्धा नियतीने हिरावला!, बहिणीकडे राहणाऱ्या हर्सूलच्या गणेशचा पिकअपने घेतला बळी!!
एमआयएमला कोणत्या चमत्काराची अपेक्षा?, ७० विरुद्ध ३३, गणित जुळणार कसं??, ठाकरे गट, वंचित, दोन्ही काँग्रेस सोबत आले तरी जुळणार नाही बहुमताचे गणित!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software