@ ७५ % छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दणक्यात मतदान!; बजाजनगर, अंभई, नानेगावमध्ये शिंदे गट-भाजप कार्यकर्ते भिडले, पोलिसांचा सौम्य लाठीमार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवारी (७ फेब्रुवारी) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दणक्यात मतदान झाले. सरासरी ७५ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पत्रकारांना दिली. मतदानादरम्यान ठिकठिकाणी वाद पहायला मिळाले. हाणामाऱ्या झाल्या. प्रतिस्‍पर्धी उमेदवाराचे पार्टी बूथही फोडले. काही ठिकाणी पोलिसांना लाठीमारही करावा लागला. पैसे वाटपाच्याही तक्रारी झाल्या...

जिल्हा परिषदेचे ६३ गट व १२६ पंचायत समिती गणांचे सदस्य निवडण्यासाठी जिल्ह्यातील २ हजार २८२ मतदान केंद्रांवर मतदान झाले. काही केंद्रांवर सायंकाळी साडेपाचनंतरही रांग कायम असल्याने मतदान करवून घेण्यात आले. दुपारी ३:३० पर्यंत ५२ टक्के मतदान झाले होते. शेवटच्या दोन तासांत २३ टक्के मतदान झाले. हे वाढलेले गेम पालटेल, असे दिसून येते. जिल्ह्यातील १८ लाख ७४ हजार ४८७ पैकी सुमारे १४ लाख ५० हजार मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात ९ लाख ७९ हजार २३४ पुरुष तर ८ लाख ९३ हजार ७७८ होती महिला मतदारांचा समावेश आहे. ४१ तृतीयपंथीयांनीही मतदान केले. सकाळी साडेसातला मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली होती. प्रत्येक मतदान केंद्रावर महसूल कर्मचाऱ्यांसह पोलिसांची कुमक, गृह रक्षक दलाच्या जवानांचा कडक बंदोबस्त तैनात होता. जिल्ह्यात ९ ठिकाणी मतमोजणी होऊन सोमवारी (९ फेब्रुवारी) दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल.

कुठे काय वाद झाले?
१. बजाजनगरात दुपारी अल्फोन्सा शाळेजवळील मतदान केंद्रावरील भाजपच्या पार्टी बूथवर मतदारांना पैशांचे वाटप होत असल्याच्या संशयावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल चोरडिया व त्यांच्या २०० ते ३०० समर्थकांनी थेट बुथवर धडक देत तोडफोड केली. संतप्त कार्यकर्त्यांनी बुथ बंद पाडत परिसरात तणावाचे वातावरण निर्माण केले. या घटनेचा व्हिडिओ काही वेळातच व्हायरल झाला. तोडफोड आणि गोंधळ झाल्यानंतर पोलीस दाखल झाले. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस  उपनिरीक्षक तथा गुन्हे प्रगटन विभागाचे प्रमुख सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. वाळूज एमआयडीसीतील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच काही ना काही कारणावरून वाद सुरू होते. विविध ठिकाणी किरकोळ गोंधळ, संशयास्पद हालचाली आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे पोलीस यंत्रणेला दिवसभर मोठी कसरत करावी लागली.

WhatsAppImage2026-02-07at9.33.57PM
वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथील १०४ वर्षीय प्रगतशील शेतकरी आसाराम फकीरराव पोटे यांनी मतदानाचा हक्क बजावला. (छायाचित्र : गणेश निंबाळकर, वैजापूर)

२. पाचोड येथील जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रावर शनिवारी सकाळी ११ वाजता आ. विलास भुमरे यांनी आपल्या लहान मुलाला ईव्हीएम मशीनपर्यंत नेत त्याच्यासोबत मतदान केले, मुलाच्या हट्टामुळे त्याच्या बोटाला शाईसुद्धा लावली. विरोधकांनी चौकशीची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली. केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांकडे खुलासा मागवला आहे.
३. सिल्लोड तालुक्यातील अंभई केंद्रावर बोगस मतदान होत असल्याच्या संशयावरून शिंदे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली. नानेगावमध्ये मतदान केंद्रावर भाजप उमेदवार त्र्यंबक गव्हाणे आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये मतदान प्रतिनिधी नेमण्यावरून बाचाबाची झाली. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की केली. पोलिसांनी मध्यस्थी करून वाद मिटवला.

४. कन्नड तालुक्यातील पिशोर व करंजखेडमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदानात व्यत्यय आला, तर पैठण तालुक्यातील बालानगरमध्ये पोलचिटअभावी महिलांनी संताप व्यक्त केला. खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगीत मतदार यादीतील घोळामुळे नागरिकांची पायपीट झाली तर गल्लेबोरगावला ईव्हीएम बिघाडामुळे अर्धा तास मतदान प्रक्रिया थांबली.
५. फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार, गणोरीमध्ये उमेदवारांच्या समर्थकांमध्ये वाद झाले. पोलिसांनी मध्यस्थी करून वाद मिटवला.

जिल्हा परिषदमध्ये प्रशासक राज येण्यापूर्वी २०१७ मध्ये भाजप २३, शिवसेना १८, काँग्रेस १६, राष्ट्रवादी काँग्रेस ३, मनसे १, रिपाइं १ असे बलाबल होते. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या जस्ट पॅक इंडस्ट्रीज कंपनीला भीषण आग

Latest News

मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या जस्ट पॅक इंडस्ट्रीज कंपनीला भीषण आग मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या जस्ट पॅक इंडस्ट्रीज कंपनीला भीषण आग
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाढेगाव येथील जस्ट पॅक इंडस्ट्रीज या पेपर रोल तयार करणाऱ्या...
मस्ती भोवली!; इसे बोलते है ट्रिगर...तान दिया, ट्रिगर दबाया... और खेल... बंदुकीतून गोळी सुटून मित्र गंभीर जखमी!, वाळूजमधील थरार, पोलीस चौकशीत बिंग फुटले 
CTET देण्यासाठी आलेल्या शिक्षिकांचे CBSE ने मंगळसूत्र उतरवले!; छत्रपती संभाजीनगरमधील प्रकाराने संताप उसळला!!
आई, वडिलांनंतर आता भाऊसुद्धा नियतीने हिरावला!, बहिणीकडे राहणाऱ्या हर्सूलच्या गणेशचा पिकअपने घेतला बळी!!
एमआयएमला कोणत्या चमत्काराची अपेक्षा?, ७० विरुद्ध ३३, गणित जुळणार कसं??, ठाकरे गट, वंचित, दोन्ही काँग्रेस सोबत आले तरी जुळणार नाही बहुमताचे गणित!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software