जाधववाडी बाजार समितीतील हर्राशी ठप्प, शेतकऱ्यांची कोंडी!; हमाल-व्यापाऱ्यांतील भांडण पेटले...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत मर्चंट्स असोसिएशन आणि मराठवाडा लेबर युनियनमध्ये हमाली दरवाढीवर सहमती न झाल्याने हर्राशी दोन दिवसांपासून ठप्प आहे. यामुळे शेतकऱ्यांची कोंडी होत आहे.

मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष हरीश पवार यांनी सांगितले, की सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने शेतकरी धान्य विक्रीला आणत आहेत. रोज १५०० ते २००० क्विंटलपर्यंत नवीन तुरीची आवक होत आहे. सोबतच मका, मागील हंगामातील गहू, ज्वारीचीही मोठी आवक होत आहे. मात्र हमालांनी काम बंद ठेवल्याने शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. शुक्रवारी (६ फेब्रुवारी) सुमारे ७ कोटी रुपयांचे दैनंदिन व्यवहार ठप्प राहिले, असे ते म्हणाले. मर्चंट्स असोसिएशनचे सचिव राकेश जैन यांनी सांगितले, की मराठवाडा लेबर युनियनने २५ टक्‍के हमाली दरवाढीची मागणी केली.

मर्चंट्‌स असोसिएशनने १० टक्‍के दरवाढीचा प्रस्ताव दिला. त्यावर युनियनने १८ टक्‍क्‍यांपर्यंत दरवाढ करण्याचे सांगितले. असोसिएशनने मग १५ टक्‍क्‍यांपर्यंत दरवाढ नेण्याची तयारी दर्शवली. तडजोड होत असतानाच काही हमालांनी विरोध केला आणि बोलणी फिस्कटली.
दरम्यान, याबाबत बाजार समितीचे संचालक देवीदास कीर्तिशाही म्हणाले, की व्यापाऱ्यांनीच हर्राशी बंद पाडली आहे. हमालांनी काम बंद केलेले नाही. युनियनचे नेते सुभाष लोमटे हमाली दरवाढीसाठी सक्रीय आहेत. मंगळवारी (१० फेब्रुवारी) बैठक होऊन त्यात हमाली दरवाढीचा अंतिम निर्णय होईल, असे ते म्हणाले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शहानूरवाडीतील श्री जगदंबा गॅस एजन्सीला २ चालकांचा दणका, गॅसच्या २०० टाक्या नेल्या चोरून

Latest News

शहानूरवाडीतील श्री जगदंबा गॅस एजन्सीला २ चालकांचा दणका, गॅसच्या २०० टाक्या नेल्या चोरून शहानूरवाडीतील श्री जगदंबा गॅस एजन्सीला २ चालकांचा दणका, गॅसच्या २०० टाक्या नेल्या चोरून
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहानूरवाडीतील श्री जगदंबा गॅस एजन्सीला २ चालकांनी मोठा दणका दिसला आहे. कमर्शियल गॅसच्या २००...
आ. विलास भुमरेंनी चक्क लेकाला नेले मतदान केंद्रात, ईव्हीएम मशीनजवळ अन्‌ लेकाच्या बोटालाही शाई लावून घेतली...
जाधववाडी बाजार समितीतील हर्राशी ठप्प, शेतकऱ्यांची कोंडी!; हमाल-व्यापाऱ्यांतील भांडण पेटले...
छत्रपती संभाजीनगर शहरात कुठेही कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही, तिसरा डोळा टिपणार, जबर दंड लागणार...
बजाजनगरात मतदान केंद्रावर १०० मीटरच्या नियमावरून गोंधळ; पोलिसांचा हस्तक्षेप, चौघांना बोगस मतदानाच्या संशयावरून पकडले!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software