CTET देण्यासाठी आलेल्या शिक्षिकांचे CBSE ने मंगळसूत्र उतरवले!; छत्रपती संभाजीनगरमधील प्रकाराने संताप उसळला!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेवेळी (CTET) छत्रपती संभाजीनगरच्या अनेक केंद्रांवर सुरक्षा नियमांच्या नावाखाली शिक्षिकांचे मंगळसूत्र काढायला लावण्यात आले. त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. नाक-कानातील दागिनेही उतरविण्यात आले. यामुळे शिक्षिकांची गैरसोय झाली. ज्यांच्यासोबत कुणी सोडायला आले होते, त्यांच्याकडे दागिने देता आले, मात्र ज्या शिक्षिका परीक्षा देण्यासाठी एकट्याच आल्या होत्‍या, त्यांच्यापुढे इतके महागडे दागिने कुणाकडे द्यायचे, असा पेच निर्माण झाला. हा धक्कादायक प्रकार आज, ८ ऑगस्टला सकाळी ७ पासून समोर आला. दरम्यान, या प्रकारामुळे आ. अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त केला असून, ही परीक्षा हिंदुस्थानात होतेय, की पाकिस्तानात, असा सवाल त्यांनी केला आहे.

नक्की काय घडलं...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) शनिवारी (७ फेब्रुवारी) आणि आज, ८ फेब्रुवारीला जिल्ह्यातील २८ केंद्रांवर घेण्यात आली. शनिवारी परीक्षा सुरळीत पार पडली. मात्र आज, ८ फेब्रुवारीला सकाळी अचानक सुरक्षा नियमांचा बागुलबुवा उभा करण्यात आला. सकाळी ९.३० ते दुपारी १२ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी सकाळी ७ पासूनच रिपोर्टिंग टाईम देण्यात आला होता. केंद्राच्या प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टरद्वारे कडक तपासणी सुरू झाली. या वेळी कोणत्याही धातूच्या वस्तूंना परवानगी नसल्याचे सांगत सुरक्षारक्षकांनी शिक्षिकांना गळ्यातील मंगळसूत्र आणि अन्य दागिने काढायला सांगितले. त्यामुळे शिक्षिकांची तारांबळ उडाली.

मंगळसुत्रासह प्रवेश देण्यास केंद्रचालकांनी स्पष्टपणे नकार दिल्याने काही शिक्षिकांनी सोबत आलेल्या नातेवाइक, पतीकडे दागिने सोपवले. पण ज्या एकट्याच परीक्षा केंद्रावर आल्या होत्‍या, त्यांच्यापुढे संकट निर्माण झाले. लांबून प्रवास करून आल्यानंतर लाखो रुपयांचे दागिने आणि मंगळसूत्र कुणाकडे द्यायचे, असा प्रश्न पडून अनेक शिक्षिकांना केंद्रावर रडू कोसळले. शिक्षिकांनी पत्रकारांकडे संताप व्यक्त केला, की सुरक्षेचे नियम पाळायला आमची हरकत नाही, मात्र मंगळसूत्र आणि दागिन्यांबाबतच्या  सूचना प्रवेशपत्रावर किंवा आधीच स्पष्टपणे का देण्यात आल्या नाहीत? जिल्ह्यात १२,००० हून अधिक उमेदवारांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. ९० टक्के उमेदवारांनी ही परीक्षा दिली. 

आमदार दानवेंकडून संताप
शिक्षिकांसोबत घडलेल्या या प्रकाराचा आ. अंबादास दानवे यांनी स्‍पष्ट शब्दांत निषेध नोंदवला. ते म्हणाले, की हिंदुत्व आणि संस्कृतीच्या गप्पा मारणाऱ्यांच्या राज्यात महिलांना मंगळसूत्र काढून परीक्षेला बसावे लागतेय. ११ वर्षांच्या सत्तेनंतरही प्रशासनाला मंगळसूत्र आणि कॉपीमधला फरक कळत नाही. ही आपली संस्कृती की सरकारी दडपशाही? ही परीक्षा हिंदुस्थानात सुरू आहे, पाकिस्तानात नाही, असा उद्वेग त्यांनी व्यक्त केला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software