- News
- पॉलिटिक्स
- बजाजनगरात मतदान केंद्रावर १०० मीटरच्या नियमावरून गोंधळ; पोलिसांचा हस्तक्षेप, चौघांना बोगस मतदानाच्या...
बजाजनगरात मतदान केंद्रावर १०० मीटरच्या नियमावरून गोंधळ; पोलिसांचा हस्तक्षेप, चौघांना बोगस मतदानाच्या संशयावरून पकडले!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदानादरम्यान बजाजनगरातील लाल बहादूर शास्त्री केंद्रावर सकाळी ११ च्या सुमारास दोन राजकीय पक्षांचे कार्यकर्ते भिडल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. ठाकरे गटाचे पंचायत समिती गणाचे उमेदवार ललिता सोनवणे यांचा शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांशी वाद झाला.
बजाजनगरमध्ये दोन वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर चार जणांना बोगस मतदानाच्या संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतले. मोरे चौक येथील दगडोजीराव देशमुख कॉलेज मतदान केंद्रावर रोहन चंद्रकांत वाहुलकर (वय २१) आणि बन्सी उमाप (वय २१, रा. भावसिंगपुरा, संभाजीनगर), तर राजा शिवाजी शाळेतील मतदान केंद्रावरही दोघांना पकडण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, प्रत्येकी ३ हजार रुपये घेऊन बोगस मतदान केले जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांच्या संशयास्पद हालचाली लक्षात येताच पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केली जात आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
जुन्या बीडबायपासवरील तथागत चौकातील झेंड्याचे ओटा तोडून नुकसान, जमाव जमला
By City News Desk
वेरूळला महाशिवरात्रीनिमित्त यात्रा; वाहतूक मार्गात मोठे बदल
By City News Desk
Latest News
07 Feb 2026 16:15:28
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहानूरवाडीतील श्री जगदंबा गॅस एजन्सीला २ चालकांनी मोठा दणका दिसला आहे. कमर्शियल गॅसच्या २००...

