१६ वर्षीय मुलीला पळवून नेत वारंवार लैंगिक अत्याचार, २३ वर्षीय तरुणाला अटक, नक्षत्रवाडीतील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : २३ वर्षीय तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून १६ वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नक्षत्रवाडीत समोर आली आहे. पोलिसांनी संशयिताला अटक केली असून, त्याला न्यायायात हजर केले असता ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

पीडित मुलगी सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. गौरव वाल्मीक जायभाये (वय २३, रा. नक्षत्रवाडी) असे संशयित तरुणाचे नाव आहे. बारावीत शिकणाऱ्या मुलीचे ४ ऑगस्टला अपहरण झाले होते. ती कॉलेजला जाते सांगून सकाळी ११ ला घराबाहेर पडली, त्यानंतर घरी परतली नव्हती. दुपारी साडेचारला ती घरी येत होती. तिच्या घरच्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तिचा मोबाइलही बंद येत होता. तिच्या मैत्रिणींकडे चौकशी केली असता ती कॉलेजलाच आली नसल्याचे समोर आले होते.

ती कुठेच मिळून येत नसल्याने तिच्या वडिलांनी सातारा पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार केली होती. पोलिसांनी मुलीला शोधून काढले, तेव्हा ती साडेतीन महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले आहे. गौरवने तिला पळवून नेल्यानंतर वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचे चौकशीतून समोर आले. त्यामुळे पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्यासोबतच पोक्सो कायद्यानुसारही गुन्हे दाखल केले आहेत. त्याचा मोबाइल जप्त करणे आणि डीएनए नमुने घेण्यासाठी सहायक लोकाभियोक्ता राजू पहाडिया यांनी पोलीस कोठडीची विनंती केली होती. विशेष न्यायाधीश एन. एस. मोमीन यांनी गौरवला पोलीस कोठडी सुनावली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या जस्ट पॅक इंडस्ट्रीज कंपनीला भीषण आग

Latest News

मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या जस्ट पॅक इंडस्ट्रीज कंपनीला भीषण आग मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या जस्ट पॅक इंडस्ट्रीज कंपनीला भीषण आग
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाढेगाव येथील जस्ट पॅक इंडस्ट्रीज या पेपर रोल तयार करणाऱ्या...
मस्ती भोवली!; इसे बोलते है ट्रिगर...तान दिया, ट्रिगर दबाया... और खेल... बंदुकीतून गोळी सुटून मित्र गंभीर जखमी!, वाळूजमधील थरार, पोलीस चौकशीत बिंग फुटले 
CTET देण्यासाठी आलेल्या शिक्षिकांचे CBSE ने मंगळसूत्र उतरवले!; छत्रपती संभाजीनगरमधील प्रकाराने संताप उसळला!!
आई, वडिलांनंतर आता भाऊसुद्धा नियतीने हिरावला!, बहिणीकडे राहणाऱ्या हर्सूलच्या गणेशचा पिकअपने घेतला बळी!!
एमआयएमला कोणत्या चमत्काराची अपेक्षा?, ७० विरुद्ध ३३, गणित जुळणार कसं??, ठाकरे गट, वंचित, दोन्ही काँग्रेस सोबत आले तरी जुळणार नाही बहुमताचे गणित!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software