औद्योगिक नगरीने मंत्री शिरसाटांच्या उमेदवार निवडीवर केले प्रश्नचिन्ह उभे!; मशाल पेटल्याने आत्मचिंतन होणार?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (संजय निकम : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज औद्योगिक नगरीचा निकाल हा केवळ जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणुकीचा आकडा नाही, तर तो पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या राजकारणाला दिलेला स्पष्ट आणि धोक्याचा इशारा आहे. कारण विकासाचे फलक, निधीचे आकडे, उद्‌घाटनांचे फोटो एका बाजूला अन्‌ मतपेटीतून आलेला संदेश वेगळाच आहे. मंत्री शिरसाट यांच्या बालेकिल्ल्यालाच भगदाड पडले आहे!

पालकमंत्री शिरसाट यांना त्यांच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद गटांत यश मिळवून देता आले नाही. प्रतिष्ठेची लढाई बनलेल्या वडगाव कोल्हाटी मध्य पश्चिम गटात भाजप पुरस्कृत अपक्ष सचिन गरड यांनी ४२६६ मते खेचत विजय मिळवला. शिंदे गटाचे हनुमान भोंडवे (मते ४२६५) अवघ्या १ मताने हरले. या निवडणुकीत नोटाला १२० मते मिळाली आहेत, हे विशेष. या १२० पैकी दोन मतांना जरी ते आपल्या कामगिरीवर आकर्षित करू शकले असते चित्र काही वेगळे असते. पंढरपूर गटात ठाकरे गटाच्या विद्या रमेश गायकवाड (मते ९०९४) या निवडून आल्या. त्यांनी २०६१ मतांनी शिंदे गटाच्या उमेदवार सारिका खोतकर (मते ७०३३) यांना पराभूत केले.

वडगाव कोल्हाटी उत्तर पूर्व गटात ठाकरे गटाच्या ललिता सुरेश सोनवणे (मते ७,०८४) यांनी शिंदे गटाच्या रक्षंदा शुभम काळे यांचा १,८७७ मतांनी पराभव केला. रक्षंदा काळे यांना ५,२०७ मते मिळाली. दौलताबाद गटात युती भाजप-शिंदे गटाची होती. तिथे भाजपच्या लंकाबाई राणुबा जाधव यांनी १२,८३१ मते घेत विजय मिळवला. त्यांनी पतंग निशाणी असलेल्या प्रतिभा कृष्णा साबळे (मते ६,१०९) यांचा ६,७२२ मतांनी पराभव केला. पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात मशाल पेटल्याने धोक्याची घंटा मानली जात आहे. मंत्री शिरसाट यांनी आपले उमेदवार विजयी करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावत तळ ठोकला होता. प्रचारसभा घेऊन वातावरण निर्मिती केल होती. अटीतटीच्या लढतीत शिंदे गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला.

उमेदवारांची निवड चुकली...
मंत्री संजय शिरसाट हे मतदारसंघात करत असलेल्या विकासकामांबद्दल दुमत नाही. त्यांना विधानसभा निवडणुकीत वाळूज औद्योगिक नगरीतून चांगले मताधिक्क्य मिळाले. पण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारांची निवड चुकली, असे आता म्हटले जात आहे. पुढे पुढे करणाऱ्या आणि पक्षाच्या नावाने घरे भरणाऱ्यांना उमेदवारी दिल्याने नाराजी वाढली होती. त्याचा परिणाम निकालावर झाला. या निकालातून तरी काम करणारे आणि केवळ पुढे पुढे करणारे कार्यकर्ते कोण आहेत, हे मंत्री शिरसाट यांनी ओळखावे, अशी अपेक्षा शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. पक्ष आणि मंत्री शिरसाटांचे नाव पुढे करून गब्बर झालेल्यांना हा निकाल तडाखा आहे. निवडणुकीत वडगाव गट नंबरचा पाणीप्रश्नही चर्चेत राहिला. शिरसाटांचा बालेकिल्ला बाहेरून पाडलेला नाही, तर तो आतून पोखरला गेलेला आहे, असे आता म्हटले जात आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मायलेकाच्या नात्याला काळे फासले, आईनेच दिली मुलाची सुपारी, गंगापूर तालुक्यातील खुनाचे शॉक्ड करणारे सत्य आले समोर...

Latest News

मायलेकाच्या नात्याला काळे फासले, आईनेच दिली मुलाची सुपारी, गंगापूर तालुक्यातील खुनाचे शॉक्ड करणारे सत्य आले समोर... मायलेकाच्या नात्याला काळे फासले, आईनेच दिली मुलाची सुपारी, गंगापूर तालुक्यातील खुनाचे शॉक्ड करणारे सत्य आले समोर...
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकभुर्जीवाघलगाव शिवारात ४७ वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या करून मृतदेह...
गंगापूरच्या भेंडाळ्याचा अंकुश यवतमाळमध्ये चालवायचा सेक्स रॅकेट!, अश्विनीसाठी करायचा घाणेरडे काम...
महत्त्वाची बातमी : समीर राजूरकर महापौरपदी विराजमान, बहुमताने निवड, उपमहापौरपदी राजेंद्र जंजाळ
औद्योगिक नगरीने मंत्री शिरसाटांच्या उमेदवार निवडीवर केले प्रश्नचिन्ह उभे!; मशाल पेटल्याने आत्मचिंतन होणार?
हर्सूलजवळ भीषण अपघात : दुभाजकाला धडकताच कार तिनदा उलटून ३० फूट उंच उडून तरुणांवर कोसळली!; एका तरुणाचा जागीच मृत्‍यू, दुसरा गंभीर
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software