दहेगाव-बिडकीन राज्य महामार्गावर भीषण अपघात; कंटेनर-आयशरच्या धडकेत दोन्ही चालकांचा मृत्‍यू

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कंटेनर आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक होऊन दोन्ही वाहनांचे चालक जागीच ठार झाले. हा भीषण अपघात गंगापूर तालुक्यातील दहेगाव-बिडकीन राज्य महामार्गावरील शिवपूर गावाजवळ रविवारी (८ फेब्रुवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास घडला. आयशरचालक नागेश नामदेव सरडे (रा. मोहोळ, जि. सोलापूर, सध्या रा. बिडकीन, ता. पैठण)  व कंटेनरचालक देविदास शिवाजी राठोड (वय ५०, रा. सुपा, जि. परभणी) अशी मृत्‍यू झालेल्यांची नावे आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, आयशर टेम्पो (क्र. एमएच २० ईएल ९४०६) दहेगावकडून बिडकीनकडे सुसाट निघाला होता. विरुद्ध दिशेने त्याच वेगात कंटेनरही (एमएच ०४ एमआर ७०४२) येत होता. शिवपूर शिवारातील आकाश हॉटेलसमोर ही दोन्ही वाहने समोरासमोर धडकली. धडक इतकी भीषण होती की, दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. दोन्ही चालक केबिनमध्ये अडकून गंभीर जखमी होत मृत्‍यूमुखी पुडले. अपघाताचा आवाज इतका मोठा होता, की शिवपूर फाट्यावर बसलेल्या ग्रामस्थांपर्यंत गेला.

त्यानंतर ग्रामस्थ बद्रीनाथ दुबिले, हनुमान चव्हाण, आनंदा निकम, कारभारी दुबिले व इतर युवकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. टेम्पोचालक नागेश सरडे स्टिअरिंग बॉक्समध्ये अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने बॉनेट ओढून बाहेर काढले; कंटेनरचालकाला बाहेर काढण्यासाठी जेसीबी मशीनची मदत घ्यावी लागली. वाळूज पोलिसांनीही तत्काळ घटनास्‍थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेतून दोन्ही गंभीर चालकांना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले. अपघाताची नोंद वाळूज पोलिसांनी घेतली आहे. अपघातामुळे राज्य महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software